सोलापूर : प्रतिनिधी
जि. प. सोलापूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी उपसंचालकांच्या अधिकाराचा स्वतः गैरवापर करून जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. कनिष्ठ लिपीक मुजावर यांनी देखील प्रतिनियुक्तीसाठी उपसंचालक यांच्याकडे विनंती अर्ज न करता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे अर्ज केला आहे. या दोघांनीही उपसंचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करून प्रतिनियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांनी “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”मध्ये गैरव्यवहार करण्यासाठी गैरप्रकारे प्रतिनियुक्ती केली आहे. त्यामुळे डॉ. संतोष नवले आणि लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांच्या गैरकारभाराची देखील चौकशी करून कारवाई करावी, असे तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
हे ही वाचा सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडून अधिकार नसताना मुजावर यांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी चुकीच्या पध्दतीने प्रतिनियुक्ती करून कनिष्ठ लिपीक मुजावर यांच्याकडे “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”ची जबाबदारी दिली आहे. जे की त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी देखील देता येत नाही. दुसरीकडे जि. प. आरोग्य विभागात सक्षम अधिकारी-कर्मचारी असताना चुकीच्या पध्दतीने मुजावर यांची नियुक्ती आणि वरून चुकीचे कामकाज दिले आहे. त्यामुळे मुजावर यांच्याकडे प्रतिनियुक्ती दिल्यापासुनच्या कार्यकाळातील “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”ची अंमलबजावणी, नविन व नुतनीकरण परवाने, त्यांच्यासाठीचे चलन वेळेत आणि बँकेतच जमा केले आहे का ? या सर्वांची खातरजमा करावी. त्यांच्या काळात ज्यांना दवाखान्यांचे नविन व नुतनीकरण परवाने दिले आहेत. त्या हॉस्पिटलची पुन्हा तपासणी करून वास्तवात असलेल्या खाटांची संख्या तपासावी. चलन वेळेत भरले आहे की स्वतः वापरले आहे, याचीही खातरजमा करावी, ज्यांना नविन आणि नुतनीकरण परवाने दिले आहेत. त्यांच्याकडून आर्थिक रक्कम उकळली असून संबंधीत हॉस्पिटलधारकांचे जबाब इन कॅमेरा घ्यावेत आणि चौकशीअंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांना निलंबीत करून बडतर्फ करावे, अशी मागणी दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा अखेर डॉ. राधाकिशन पवारांकडील उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे