रणजित वाघमारे : सत्ताकारण न्युज नेटवर्क
HIV AIDS चे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने देशभरात शासकिय यंत्रणेच्या अधिपत्याखाली प्रत्येक जिल्हा अन् तालुक्यात एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्रे उभारली आहेत. ज्यामुळे एचआयव्ही एड्स नियंत्रणात येईल. ज्यांना एचआयव्ही एड्स झाला आहे, त्यांना चांगले औषधोपचार मिळतील. त्यांचे जीवनमान सुधारेल आणि जनजागृती होऊन एड्स नाहीसा होईल. परंतु ज्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्रातून एचआयव्ही एड्स वर उपचार केले जातात, त्याच केंद्रावरून याउलट गंभीर प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेस HIV AIDS नसतानाही जवळपास वर्षभर HIV AIDS ची प्रतिबंधात्मक औषधे सुरू होती. परिणामी यादरम्यान त्या महिलेचा सुखी संसार उध्वस्त झाला असून त्यांना आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि शारिरीक नुकसानीस समोरे जावे लागले आहे.
हे ही वाचा दिनेश राठोड यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करा
घडलेली घटना अशी की, सोलापूर जिल्ह्यातील एक महिला गरोदरपणातील तपासणीसाठी एका रूग्णालयात गेली होती. येथे नियमीत तपासणीचा भाग म्हणून तेथील संलग्नीत लॅब मध्ये रक्त तपासण्याही करण्यात आल्या. परंतु यावेळी रक्त तपासणीत त्यांना एचआयव्ही एड्स असल्याचे सदरच्या लॅब धारकाने सांगितले. तसा रिपोर्टही दिला. त्यामुळे येथील डॉक्टर आणि लॅब टेक्नीशियन यांचा खोडसाळपणा त्या महिलेचे आयुष्य उध्वस्त करून गेला. त्या लॅब धारकाने त्या महिलेस पुढील उपचारासाठी जवळच्या ICTC केंद्र येथे पुढील उपचारासाठी पाठवले. शासनाच्या ICTC केंद्र येथे पुन्हा तपासण्या करून पुढील औषधोपचार करणे गरजेचे होते. तसेच पुढे त्या महिलेस ART सेंटर येथे पाठवणे गरजेचे होते. परंतु ICTC केंद्र आणि ART सेंटर येथे पुन्हा तपासण्या करून औषधोपचार करणे बंधनकारक असताना त्यांनी पूर्वीच्या लॅब धारकाच्या चुकीच्या रिपोर्टच्या आधारे त्या महिलेस HIV AIDS ची औषधे सुरू केली. या सर्वांवर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्रातील अधिकाऱ्यांनी तपासण्या व समुपदेशन करणे गरजेचे होते. त्यांनीही हलगर्जीपणा केला. परिणामी संबंधीत महिलेस HIV AIDS नसतानाही वर्षभर औषधे घ्यावी लागली आहेत. त्या महिलेचा नाहक बळी घेतला गेला आहे. त्या महिलेचा संस्थार उध्वस्त केला आहे. त्या महिलेस आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि शारिरीक नुकसानीस समोरे जावे लागले आहे. सदरचा प्रकार आणि संबंधीत सर्व कागदपत्रे “सत्ताकारण न्युज नेटवर्क”च्या हाती लागली आहेत. त्यामुळे सदरची गंभीर गोष्ट उजेडात आणली जात असून संबंधीत महिलेस न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यातील दोषींवर कठोर कारवाई आणि संबंधीत महिलेस न्याय आणि नुकसान भरपाई देतील का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा जिल्हा लेखा व्यवस्थापक विजय गायकवाड, राहुल जवादे यांची सेवा समाप्त
प्रकार उजेडात येऊनही महिलेस औषधे सुरूच
सदरच्या महिलेस HIV AIDS नसल्याचे यातील सर्वांना महिन्या-दोन महिन्यातच लक्षात आले. परंतु यातील दोषींनी एकमेकांना वाचवण्यासाठी त्या महिलेस पुढे वर्षभर औषधे सुरू ठेवली. मात्र सदरची महिला पुढील तपासणीसाठी इतर हॉस्पिटलमध्ये गेली असता, तेथे हा गैरप्रकार उजेडात आला. त्यामुळे तपासण्या न करता संबंधीत महिलेस HIV AIDS चे औषधोपचार सुरू केल्याने यातील सर्वच दोषी आहेत, परंतु प्रकार उजेडात येऊनही महिलेचे समुपदेश न करता औषधे सुरूच ठेवली, त्यामुळे यातील दोषी हे पूर्वीच्या गुन्ह्यापेक्षा आणखीच जास्त दोषी असल्याचे दिसून येत आहे. या औषधांमुळे संबंधीत महिला आणि तीचे अपत्य यांच्यावर औषधांचा साईडइफेक्ट झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोषींवर कठोर कारवाई, दोषींकडून आणि शासनाकडून महिलेस नुकसान भरपाईची गरज
सदरच्या गंभीर प्रकारात खासगी रूग्णालय, खासगी लॅब चालक, तेथील लॅब टेक्नीशियन, ICTC सेंटर चा इन्चार्ज असणारा वैद्यकीय अधिकारी आणि तेथील लॅब टेक्नीशियन, ART सेंटर येथील सिनिअर मेडिकल ऑफिसर आणि लॅब टेक्नीशियन, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्रातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मुल्यमापन व सहनियंत्रण सहायक हे सर्व या गंभीर प्रकारात दोषी आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच यातील दोषी अधिकारी-कर्मचारी आणि शासनाकडून सदरच्या पिडीत महिलेस नुकसान भरपाई आणि न्याय देण्याची गरज आहे.
हे ही वाचा डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर
बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ
तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…





