सोलापूर : प्रतिनिधी
उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर, डॉ. सुहास माने आणि डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या पध्दतीने करत असलेल्या कारभाराविरोधात 15 ऑगस्ट पासून पत्रकार सैफन शेख यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यानंतरही संबंधीत प्रकरणांवर कारवाई न झाल्यास आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उप सचिव अनिरूध्द जेवळीकर यांच्याविरोधात “भीक मांगो आंदोलना”चा इशारा त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये घोळ
महापालिका सेवा भरती नियमांना मान्यता दिल्याचा शासन निर्णय खुद्द उप सचिव अनिरूध्द जेवळीकर यांच्या सहीने 15 डिसेंबर 2022 रोजी जारी केला आहे. आणि जेवळीकर यांनीच यातील सेवा भरती नियमांना हरताळ फासत सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी डॉ. राखी सुहास माने यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. शासनाच्या नियमांनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD. PSM/DPH पदवी आणि शासन/केंद्र शासन/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाचा किमान 7 वर्षांचा पर्यवेक्षक व कार्यकारी पदाचा अनुभव असलेले राज्यात जवळपास 4 ते 5 हजार डॉक्टर आहेत. असे जेष्ठ व पात्र डॉक्टर असताना उप सचिव जेवळीकरांनी MBBS ENT असलेल्या व क्लिनिकली सेवा देणे बंधनकारक असलेल्या डॉ. राखी सुहास माने यांना बेकायदेशीरपणे प्रतिनियुक्ती दिली आहे. याविरोधात पत्रकार सैफन शेख यांनी 15 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तसेच याबरोबर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांच्या गैरकारभाराची कसून चौकशी करणे, सोलापूर महानगरपालिकेतील डॉ. राखी माने यांची आरोग्य अधिकारी पदासाठी शैक्षणिक अर्हता नसताना केलेली प्रतिनियुक्ती रद्द करणे, उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी डॉ. राखी माने यांची चुकीच्या पद्धतीने प्रतिनियुक्ती केल्याने त्यांचे निलंबन करून त्यांना चौकशीअंती बडतर्फ करा आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरूच केले आहे. या आंदोलनाबाबत उप सचिव अनिरूध्द जेवळीकर आणि आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने यांना प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
अन्यथा भिक मांगो आंदोलन
सदरच्या बेमुदत आंदोलनावेळी डॉ. राखी सुहास माने यांची प्रतिनियुक्ती रद्द न केल्यास सोलापुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सोलापूर शहरात फिरून पत्रकार सैफन शेख यांच्याकडून ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ‘भीक मांगो’ आंदोलनातून जमा झालेली रक्कम ही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार सैफन शेख यांनी दिली.
हे ही वाचा सोलापूर ॲन्टी करप्शनमधील अधिकाऱ्यांकडून तक्रारदाराच्या जिवितास धोका
जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांची कोल्हापुरला नियुक्ती
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक पदी पुन्हा डॉ. स्वप्निल लाळे