सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
पालघर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर पूर्ण करून येत्या 31 डिसेंबरपर्यंत ते नागरिकांच्या सेवेत कार्यरत होणे गरजेचे आहे. या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सक्षम करणार, असे आश्वासन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ग्वाही दिली. या बैठकीला आमदार राजेंद्र गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग नोंदविला.
हे ही वाचा 11 हजारहून अधिक मुलांवर मोफत ह्दयरोग व इतर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न
या बैठकी दरम्यान आरोग्य मंत्री आबिटकर यांनी जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला. सफाळे ग्रामीण रुग्णालयासाठी जागा व निधी उपलब्ध असून निविदा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून बांधकाम तत्काळ सुरू होईल. डहाणू महिला रुग्णालयासाठीही निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. जव्हार, डहाणू व आदिवासी प्रवण भागातील सर्व आरोग्य संस्थांनी नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांतिगतले.
या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, ठाणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर तसेच आरोग्य विभागाचे विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा डॉ. मनिषा विखे आणि डॉ. मिनाक्षी बनसोडे यांचे निलंबन
आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या बोगस भरती प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे दाखल





