सोलापूर : रणजित वाघमारे
आरोग्य मंत्री (Health Minister) तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागातील मक्तेदारी असलेल्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याकडून सलाईनवर असलेला आरोग्य विभाग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र दुसरीकडे त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्याकडून “आरोग्य विभागात लुडबुड” सुरू आहे. परिणामी येथील अधिकारी-कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
आरोग्य विभागात (Health Department) सेवानिवृत्ती नंतरही ठाण मांडूण बसलेले डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील, वीस वर्षांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेले डॉ. शितलकुमार जाधव, कोरोना काळात निकृष्ठ दर्जाचे साहित्य खरेदी आणि महिलांसंदर्भात गैरवर्तनासाठी जालन्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. विवेक खतगावकर यांना आरोग्य मंत्री तानाजी (Tanaji Sawant) सावंत यांनी घरचा रस्ता दाखवला. यामध्ये तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांचाही नंबर लागतो. आरोग्य मंत्री (Health Minister) तानाजी सावंत यांच्याकडून गैरप्रकाराला कोणत्याही प्रकारे थारा दिली जात नाही. बदल्या, प्रतिनियुक्त्यांसाठी त्यांच्याकडे रांग लागली असताना ते याकडे लक्ष न देता नियमानुसार सर्व काही होणार असल्याचे ते संबंधीतांना सांगत असतात. परंतु त्यांचे बंधू तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांच्याकडून बदली, प्रतिनियुक्ती, खरेदी प्रक्रीया आदी सर्व बाबतीत लुडबुड सुरू आहे. सातारा, जालना आणि सोलापूर येथील रिक्त असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांनी तानाजी सावंत यांच्याकडे निभाव लागत नसल्याने शिवाजी सावंत यांच्याकडे धाव घेतली आहे. शिवाजी सावंत यांच्याकडून संबंधीतांना शब्द दिला जात आहे, असे खुद्द गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्यांकडून सर्वत्र सांगितले जात आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी पदी मीच विराजमान होणार, दोन दिवसांत ऑर्डर पडणार अशा गप्पा मारल्या जात आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंकडून मार्च एंडच्या औषध खरेदीत कोणत्या नियम-अटी टाकायच्या, याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत. यावरून औषध पुरवठाधारकही शिवाजी सावंत यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. तर संबंधीत अधिकाऱ्यांपर्यंत सूचना पोहचवण्यासाठी यापूर्वी विविध मंत्र्यांचे पीए होण्यात “प्राविण्य” मिळवलेले “लटके” दूरध्वनीवरून संभाषण करून देत आहेत. दुसरीकडे सांगोल्यातील “दत्ता”चा अवतार असलेले “सावंत”ही स्वयंघोषीत पीए म्हणून मिरवत आहेत, की खरेच पीए आहेत ? याबाबत सोलापूर शहर-जिल्हा आणि आरोग्य विभागात चर्चा सुरू आहे. Health Minister
नेमके खरे काय ?
आरोग्य विभागात ठाण मांडून बसलेले, बेकायदेशीर कामे करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखांनी आरोग्य मंत्र्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. आरोग्य मंत्र्यांनी याची दखल घेत संबंधीत अधिकाऱ्याचे निलंबन केले. तर या अधिकाऱ्यासाठी कार्यरत असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यातील अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, अनेकांची चौकशी समिती नेमूण चौकशी सुरू आहे. मात्र ज्यांच्यावर आरोग्य मंत्र्यांनी कारवाई करणाच्या सूचना दिल्या. त्यांच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी संपर्क प्रमुखांकडून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी आरोग्य विभागाच्या विरोधात जायचे आणि संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी मात्र त्याच कारवाईस पात्र असलेल्यांची बाजू घ्यावयाची. एकाने मारल्यासारखे करायचे ? तर दुसऱ्याने डोळे पुसल्यासारखे ? नेमके खरे काय ? की आरोग्य विभागाच्या बाबतीत राजकारण केले जात आहे का ? अशी चर्चा खुद्द आरोग्य विभागात रंगली आहे. Health Minister
शासकीय विश्रामगृहात भरते शाळा
संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याकडून जिल्ह्यातील राजकारण असो की आरोग्य विभागातील कामकाज. याबाबत सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात शाळा भरवली जाते. येथेच आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची परेड असते. यावेळी रजेवर असणारे आरोग्य विभागातील डॉक्टरही हजेरी लावून जातात. परंतु ज्या आरोग्य विभागाला डोस देऊन आरोग्य मंत्री सरळ करत आहेत, त्याच आरोग्य विभागात आरोग्य मंत्र्यांचे बंधू मात्र संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता निर्णय घेत आहेत, अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, याची चर्चा आरोग्य विभागात होत आहे. Health Minister