– सोलापूर जिल्हा आणि महिला व शिशु रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून सोलापूर येथील गुरुनानक चौकात 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय व 100 खाटांचे महिला व शिशु रुग्णालय सरकारच्या निष्काळजीपणामुळे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सदरचे हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांचा फोटो सदरच्या रूग्णालयावर लावून त्या फोटोला गाजराचा हार आज घालण्यात आला.
हे ही वाचा Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा
सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शुक्रवारी (6 ऑक्टोबर) गुरुनानक चौकातील जिल्हा आणि महिला व शिशु रुग्णालय येथे दुपारी 2 वाजता सदरचे आंदोलन केले. संबंधीत रूग्णालयाच्या फर्निचर कामासाठी सरकारकडे 5 कोटी रूपये नाहीत. यासाठी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे व सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली Health Minister Tanaji Sawant यांच्या प्रतिमेस गाजराचा हार घालून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष डोंगरे म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 2013 ला सदरचे रूग्णालय मंजूर केले गेले. या रूग्णालयाच्या सध्या वर्षभरापासून दोन्ही रुग्णालयांच्या इमारती बांधून तयार आहेत. परंतु सरकारच्या आडमुठ धोरणामुळे केवळ रुग्णालयात फर्निचरच्या कामाचे कारण देऊन बंद अवस्थेत ठेवले आहे. सरकारने, आरोग्यमंत्र्यांनी तसेच पालकमंत्री यांनी रुग्णालय तत्काळ सुरू करावे. अन्यथा आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना सोलापूर शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
हे ही वाचा Health Minister | आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”
यावेळी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश युवक सचिवश्रीकांत वाडेकर, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, रुकीया बिराजदार, ज्योती मालतुमकर, नागश्री कांबळे, दिनेश डोंगरे, चंद्रकांत नाईक तसेच इतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Health Minister Tanaji Sawant
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 6 Oct 2023 | आजचे राशीभविष्य