प्रतिनिधी : रणजित वाघमारे
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार सध्या राज्यभर चर्चिला जात आहे. आरोग्य विभागातील प्रधान सचिवांपासुन ते शेवटच्या स्तरावरील आरोग्य सेवक-आशा स्वयंसेवकांपर्यंत समाधानाचे वातावरण आहे. कारण आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून “राज्यातील जनतेसाठी तत्काळ आणि तत्पर आरोग्य सेवा” तर “कामचुकार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई” अशी बेधडक कारवाई सुरू आहे. ज्यामध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मनोहर बनसोडे आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले होते. मात्र पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर खा. संजय राऊत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मनसेचे राम बोरकर ते आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. तरीही डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. राजेश गायकवाड यांना अद्याप निलंबीत केले नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. राजेश गायकवाड यांना घाबरतात का ? कारवाईत दुजाभाव का करत आहेत ? अशी चर्चा करत “आरोग्य मंत्री साहेब घाबरू नका, डॉ. राधाकिशन पवार यांना निलंबीत करा; कोल्हापुरची अंबाबाई तुमच्या पाठीशी आहे” अशी गंमतीशीर चर्चा राज्यातील सार्वजिक आरोग्य विभागात रंगली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्री “ॲक्शन मोड”वर; अधिवेशनात तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने कारवाईचे दिले आदेश
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून यापूर्वी आरोग्य विभागात बेधडक कारवाई झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी 108 ॲम्ब्युलन्स सेवा वेळेत उपलब्ध करून न दिल्याने उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्यासह इतर दोन डॉक्टरांचे तत्काळ निलंबन केले होते. याबाबत विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. दुसरीकडे कोरोना काळात जिल्हा रूग्णालयात औषधी व साहित्य खरेदीत अनियमितता आढळल्याचे लेखा परिक्षण अहवालात समोर आल्याने जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांचे तत्काळ निलंबन केले. याबाबत भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. राजेश गायकवाड यांच्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर अधिवेशनात 6 महिन्यापूर्वी टक्केवारी वसुलीचा आरोप केला होता. तरीही आरोग्य मंत्र्यांनी अद्याप संबंधीतांवर निलंबनाची कारवाई केली नाही. डॉ. मनोहर बनसोडे आणि डॉ. अशोक थोरात यांच्यावर ज्या तत्परतेने निलंबनाची कारवाई आरोग्य मंत्र्यांनी केली, त्याच तत्परतेने डॉ. राधाकिशन पवार आणि डॉ. राजेश गायकवाड यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? आरोग्य मंत्र्यांकडून कारवाईत दुजाभाव का केला जात आहे ? असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागात आणि राज्यातील नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे. तर दुसऱ्याबाजुला याची खिल्ली उडवत “आरोग्य मंत्री साहेब घाबरू नका, निलंबीत करा; कोल्हापुरची अंबाबाई तुमच्या पाठीशी आहे” अशी गंमतीशिर चर्चाही सर्वत्र रंगली आहे.
हे ही वाचा अखेर डॉ. राधाकिशन पवार, डॉ. बबिता कमलापुरकर यांची महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी