Google’s 25th Birthday : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन ‘Google’ आज पंचविशीत पोहचले आहे. त्याचा आज, 27 सप्टेंबर रोजी 25 वा वाढदिवस. Google चे Founders सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज या दोघांनी एका गॅरेजमधून सुरवात केलेले Google आज जगभर पोहचले आहे. Google ने देखील आज स्वतःचा वाढदिवस Google’s 25th Birthday दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या पध्दतीने Doodle च्या माध्यमातून साजरा केला आहे.
Google ने Doodle वर असा साजरा केला वाढदिवस
Doodle वर क्लिक केल्यानंतर यूजर्स एका नव्या पेजवर जातो. त्या नव्या स्क्रिनवर Google च्या 25व्या वाढदिवसानिमित्त आपणास सर्व माहिती मिळते. आपणास संपूर्ण स्क्रीनवर रंगीबेरंगी कन्फेटी (रंगीत कागदांचे तुकडे) उधळल्याचे दिसते. तसेच Google ने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या Doodle वर म्हणत आहे की, आज आम्ही Doodle व्दारे Google चा २५ वा वाढदिवस साजरा करत आहोत. वाढदिवस हे तुमचे वय दर्शवते. Google’s 25th Birthday
मग आमचा जन्म कसा झाला हे तुम्हाला बघायचे असेल तर हे पेज नक्की पाहा, असे म्हणत Google Doodle ने पहिल्यांदा झळकलेल्या Google Doodle चा फोटो दिला आहे. तर 27 सप्टेंबर 1998 ही Google ची जन्मतारीख सांगितली आहे. याच दिवशी हे सर्च इंजिन सुरु झाले. पुढे जगाला या सर्च इंजिनची भुरळ पडली. इंटरनेट सुरु झाल्यानंतर वैविध्यपूर्ण आणि विश्वासू माहिती देण्यात Google सर्च इंजिनचा सिंहाचा वाटा आहे. Google’s 25th Birthday
Google’s 25th Birthday | Google आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग
इंटरनेटवर आपणास काहीही शोधायचे असल्यास आपल्याला सर्च इंजिनची गरज असते. Google व्यतिरिक्त इतरही सर्च इंजिन आहेत. मात्र, Google जेवढे लोकप्रिय आहे, तेवढे कोणतेच सर्च इंजिन लोकप्रिय नाही. Google एवढे लोकप्रिय आहे की, ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. यातूनच Google चा आपणा सर्वांवर पडलेला प्रभाव आपल्याला दिसून येतो.
यांनी केली Google ची स्थापना
Sergy Brin आणि Larry Page (सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज) हे दोघे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्सची पदवी घेत होते. त्यावेळी इंटरनेट बाबत दोघांचेही व्हिजन सारखेच असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन एक सर्च इंजिन तयार करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात Google ची सुरुवात एक रिचर्स प्रोजेक्ट म्हणून झाली होती. Sergy Brin आणि Larry Page यांनी Google.stanford.edu या एड्रेसवर इंटरनेट सर्च इंजिन तयार केले होते. यातूनच 27 सप्टेंबर 1998 साली Google इनकॉर्पोरेटेडची अधिकृत स्थापना केली आणि Google जन्माला आले.Google’s 25th Birthday
Google.com डोमेन हे १५ सप्टेंबर १९९५ रोजी नोंदणीकृत केले होते. पुढे Google हे ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनी म्हणून नोंदणीकृत केले. तर २७ सप्टेंबर १९९८ रोजी Google सर्च इंजिनवर रेकॉर्ड नंबर पेज सर्च केले गेले. त्यामुळे तेव्हापासून Google चा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो. Google आज जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. Google वर तुम्ही १०० पेक्षा जास्त भाषांमध्ये माहिती शोधू शकता. Google हे सर्च इंजिन लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईलवर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. Google’s 25th Birthday
Google’s 25th Birthday | पूर्वी Google चे नाव होते ‘बॅकरब’
पेज यांनी सुरुवातीला Google चे नाव ‘बॅकरब’ असे ठेवले होते. मात्र, कालांतराने ‘बॅकरब’ हे नाव बदलून त्यांनी ‘Google ‘ हे नाव ठेवले.
असा आहे ‘Google ‘चा अर्थ
Google हा शब्द खरंतर ‘Googol’ या शब्दाचं बदललेलं रुप आहे. एका अंकावर शंभर शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते, तिला गुगोल म्हणतात. यावरूनच Google हे नाव ठेण्यात आले आहे.