सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मचारी संघटनेकडून प्रतिष्ठान श्री गणरायाची प्रतिष्ठापणा (Ganeshotsav) करण्यात आली आहे. या प्रतिष्ठापणा केलेल्या गणरायाची पूजा व आरती विद्यापीठातील मुस्लिम कर्मचारी बांधवांनी करून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले आहे.
सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अनेक उपक्रम राबवले जातात. गेल्या ७-८ वर्षांपासून विद्यापीठ परिसरात विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व कर्मचारी भक्ती भावाने यामध्ये सहभागी होतात. त्यातच आज शुक्रवारी विद्यापीठातील मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलिम शेख आदी मुस्लीम कर्मचारी बांधवांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली. यामुळे विद्यापीठ कर्मचारी संघटनेने या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश दिला आहे. संपूर्ण १० दिवस विविध कार्यक्रमातून उत्सव साजरा केला जातो. महाप्रसादाचेही सर्वांना वाटप केले जाते.
यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल थोरात, सचिव रविकांत हुक्किरे, खजिनदार हरिष गारमपल्ली, मार्गदर्शक सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, परीक्षा प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, संगमेश्वर मठ, प्रशांत भोसले, पंकेश व्हनमाने, शिवा बोराळे, आदी उपस्थित होते. Ganeshotsav
हे ही वाचा
लालबागच्या राजाचरणी लाखोंचं दान!