Fraud : व्यापारांचा विश्वास संपादन करून तुर धान्यास बाजार भावापेक्षा जास्त भाव देतो, असे प्रलोभन दाखवून अनेक व्यापाऱ्यांना तूर धान्य देण्यास भाग पाडले आणि व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या तुरीची रक्कम न देता जवळपास १ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. या प्रकरणी सोलापूर येथील जेलरोड पोलीस ठाण्यात सोमनाथ परमेश्वर चरे (रा. शेळगी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शेळगी परिसरातील ककैय्या नगर, चौडेश्वर पतसंस्था शेजारी राहणारे सोमनाथ परमेश्वर चरे (वय-३८ वर्षे) यांनी सोलापूर बाजार समिती मधील अनेक व्यापाऱ्यांना तुरीला बाजारभावापेक्षा अधिक भाव देतो, असे सांगून तूर खरेदी केली. व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यावर जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 दरम्यान अनेक व्यापाऱ्यांना तूर देण्यास भाग पाडले. मात्र त्यांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे सदरच्या व्यापाऱ्यांची फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आले.
या व्यापाऱ्यांबरोबर झाला Fraud
सोमनाथ चरे यांनी, अरूण धरणे यांच्याकडून २५५.४० क्वि., साई श्रध्दा ट्रेडर्सकडून ४३५.९० क्वि., सन ट्रेडर्सकडून ४३५.९० क्वि., फुलचंद कडून ३०२.२५ क्वि., समर्थकडून ६८.८० क्वि., सानवी १९२.९५ क्वि., प्रणव कडून १२०. २० क्वि. असे तूर विविध दराने खरेदी केली. मात्र या व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे दिले नाहीत. याप्रकरणी मनोज अरूण धरणे (वय – ४३ वर्षे, रा-१७, योगीनाथ हौसिंग सोसायटी, शेळगी, सोलापूर) यांनी मंगळवारी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद (FRI) दाखल केली आहे.
1 कोटी 57 लाखांचा Fraud
सोमनाथ चरे यांनी, उपरोक्त सर्व व्यापाऱ्यांची १ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम न देता फसवणूक (Fraud) केली असल्याचा गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सदरच्या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बहिरट हे करीत आहेत.
Fraud
हेही वाचा
औषध महामंडळात “गरजे” महाराष्ट्र माझा
आकुडे यांचे बांधकामात दुर्लक्ष, उपसंचालकांनी दिली नोटीस अन नाकारला खुलासा