– दिवाळीमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ घेणे टाळा
सोलापूर : प्रतिनिधी
Food Adulteration During Diwali :अन्नपदार्थात कृत्रिम रंग घालणे बेकायदेशीर आहे. तरीही सोलापुरातील काही महत्त्वाच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजीमध्ये रंग टाकण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीन हॉटेलची तपासणी करण्यात आली. यामध्ये काजूकरी लाल दिसण्यासाठी कृत्रिम रंग वापरण्यात आल्याचे आढळून आले. परिणामी अशा तीन हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत अन्नपदार्थ खरेदी करताना रंग मिसळलेले पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी केले आहे.
हे ही वाचा Recruitment | दिवाळीत सोलापूर महापालिकेत 226 पद भरतीचा धमाका
सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई करुन माल जप्त केला आहे. 31 ऑगस्ट ते 7 नोव्हेंबर या कालावधीत तेल व वनस्पती-तेलाचे एकूण 5 नमुने व वनस्पतीचे 2 नमुने, दूध या अन्न पदार्थाचे 55 नमुने व दुग्धजन्य पदार्थाचे 18 नमुने, रवा, मैदा, आटा व इतर असे एकूण 22 नमुने तसेच तुप, खवा, पनीर या अन्न पदार्थाचे एकूण 11 नमुने विश्लेषणासाठी घेतले असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा एम. के. फाऊंडेशनने एक हजार कुटूंबांची दिवाळी केली गोड
या मोहिमेत 18 सप्टेंबर रोजी बेगमपुर (ता. मोहोळ) येथील मे. बॉम्बे स्विट मार्ट व बेकरी या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी – 40 किलो, सुमारे 10 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी मे. उत्तम चौधरी, भवानी पेठ, सोलापूर या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी – 68 किलो, 17 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील मे. भगवान राम पालिवाल या पेढीवर धाड टाकून स्पेशल बर्फी – 103 किलो, किंमत 25 हजार 750 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा केंद्र आणि राज्यातील नाकर्ते भाजप सरकार विरोधात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
तसेच 2 नोव्हेंबर रोजी कोंढारपट्टा (माळशिरस) येथील मे. शौर्य गुळ उद्योग या ठिकाणी धाड टाकून गुळ व साखर (अपमिश्रक) – 918 किलो, किंमत 35 हजार 125 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 7 नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील मे. ध्रुव एजन्सी या ठिकाणी धाड टाकून दुध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कंपनीचे व्हे पावडरचे एकूण 1 हजार 813 किलो सुमारे 1 लाख 59 हजार 640 किंमतीचा साठा जप्त केला असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले.
हे ही वाचा Lek Ladki Yojana | मुलींना १८ वर्ष पूर्ण होताच मिळणार ७५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती
आरोग्य विभागात मुंबई, पुणयासह 11 ठिकाणी उपसंचालकांच्या नव्याने नियुक्त्या