सोलापूर : प्रतिनिधी
राज्य परिवहन सोलापुर विभागातील विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, भांडार अधिकारी, लेखा अधिकारी यांचा प्रताप वेगळाच प्रताप जनतेसमोर येत आहे. यांच्याकडून सोलापूर विभागात मनमानी कारभारातून एसटी महामंडळाची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे याकडे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर हे काय कारवाई करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबतची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पंढरपूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
शिवाजी पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, राज्य परिवहन विभाग सोलापुर येथील भांडार अधिकारी हे विभाग नियंत्रक, लेखाधिकारी व यंत्रअभियंता यांच्या वरदहस्तामुळे भांडारात अनावश्यक वस्तु/ साहित्यासाठा करुन साठेबाजी करत आहेत. यामुळे स्थानिक खरेदीदार व राज्याबाहेरील कंपन्यांकडुन त्याच-त्या साहित्याची मागणी करुन त्यांचा साठा भांडार विभागात करीत आहेत. या साहित्यासाठी लागणारा फंड हा वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे व खरेदीतुन मिळणाऱ्या कमिशनसाठी होत असल्याची बाब समोर येत आहे. सोलापुर विभागातील प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या बहुंताशी गाड्या या रस्त्यातच खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. एका बाजुला आगारातील अधिकारी हे अपुऱ्या साहित्या अभावी गाड्या बंद पडत असल्याची उत्तरे देतात. तर दुसरीकडे प्रवांशाची बस बिघाडामुळे गैरसोय होत आहे. दुसरीकडे चालक वाहक अधिकाऱ्यांच्या वेतनासही विलंब होत आहे, अशी परिस्थिती असताना विभागातील फंड लेखाअधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडुन अनावश्यक साहित्यासाठी फंड उपलब्ध करुन आनावश्यक साहीत्याची साठवणुक करीत आहेत. यातून महामंडळाची आर्थिक लुट होत आहे. या लुटीतुन झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी करावी, अशी मागणी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पंढरपूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पवार यांनी केली आहे.
हे ही वाचा MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही IEC चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडे
वरिष्ठांचा आदेश डावलून सांख्यिकी व्यतिरिक्त गैरप्रकारे इतर कामकाज पाहणाऱ्या काकडेंना बडतर्फ करा