Drug Mafia Lalit Patil Latest News : पोलिसांच्या ताब्यात असताना Drug Mafia Lalit Patil ससून मधून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर पोलिसांची विविध पथके विविध राज्यात त्याचा शोध घेत होते. मात्र एका कॉलवरून त्याचे लोकेशन समजले आणि अखेर Drug Mafia Lalit Patil मुंबई पोलिसांच्या हाती लागला असून त्याला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे.
Drug Mafia Lalit Patil हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून फरार झाला होता. गेल्या 15 दिवसांपासून तो विविध ठिकाणी लपून बसला होता. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) देशभरात त्याचा शोध सुरू होता. पोलीस मागावर असतानाच Drug Mafia Lalit Patil ने त्याच्या एका सहकाऱ्याला कॉल केला आणि त्याचे लोकशेन पोलिसांना समजले.
हे ही वाचा MD Drugs | सोलापूरात 116 कोटी रूपये किंमतीचा मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थांचा साठा जप्त
ससून रुग्णालयातून Drug Mafia Lalit Patil फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली गेली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची विशेष 10 पथके तैनात करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांपासून पोलीस पथके ललित पाटीलच्या मागावर होती.
आणि साथीदारांची धरपकड सुरू
ससून रुग्णालयातून Drug Mafia Lalit Patil फरार झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांची धरपकड करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी काही साथीदारांना अटकही केली. दुसरीकडे पोलीस ललित पाटीलचा शोध घेतच होते. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सापळे रचण्यात येत होते, परंतु त्यामध्ये त्यांना अपशय येत होते.
एक कॉल अन् Drug Mafia Lalit Patil ला अटक
ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील ने एका ट्रॅव्हल कंपनीची कार घेतली होती. तो 2 सहकाऱ्यांसह आधी गुजरातला गेला होता. त्यानंतर तो धुळ्याला आला. धुळ्यानंतर पुढे कर्नाटकात गेला आणि नंतर ललित पाटील बंगळुरुमध्ये पोहोचला. अशा पध्दतीने ललित पाटील वेगवेगळ्या राज्यात फिरत असताना तो त्याच्या एका सहकाऱ्याच्या संपर्कात होता. परिणामी या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. अशातच अटकेत असलेल्या आरोपीला ललित पाटीलने एक कॉल केला. यामुळे पोलिसांना त्याचा ठिकाणा कळण्यास मदत झाली. त्यानंतर मुंबईतील साकीनाका पोलीस हे चेन्नईत पोहोचले. त्यांनी सापळा रचून ललित पाटील आणि त्याच्या 2 साथीदारांना अटक केली. यानंतर त्याला आता मुंबईत आणले जाणार आहे.
ललित चा भाऊही अटकेत
पुण्यातून ललित पाटील फरार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पुणे पोलीस ललित पाटीलच्या गावी पोहोचले. त्याचा भाऊ भूषण पाटीलला ही पुणे पोलिसांनी अटक केली. सध्या त्याला नाशिकला नेण्यात आले आहे.