सत्ताकारण न्युज नेटवर्क इफेक्ट
डॉ. राधाकिशन पवार यांची विविध आरोप आणि तक्रारींमुळे ज्या पदावरून हकालपट्टी केली, त्याच पदाचा अतिरिक्त पदभार पुन्हा डॉ. राधाकिशन पवारांकडेच देण्यात आला होता. त्यामुळे बदली होऊनही ते त्याच पदावर कार्यरत होते. याबाबत “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्तामध्ये “आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांनी आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असुन त्या ठिकाणी इतर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती का केली जात नाही ? आरोग्य विभागात सक्षम अधिकाऱ्याची कमी नसताना सोयीस्कर निर्णय का घेतला जात आहे ? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच याबाबत पंढरपूर येथे आषाढी वारी आढावा बैठकीसाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे आल्यानंतर 297 कोटींचा औषध घोटाळा, त्यामध्ये डॉ. राधाकिशन पवार यांचे निलंबन आणि इतर गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या. यावर आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सर्व आरोपांची शहानिशा करून कारवाईही केली जाईल. परंतु सध्या 8 दिवसात आहे त्या पदावरून काढून टाकले जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर आरोग्य मंत्र्यांनी शब्द खरा करून दाखवला असून डॉ. राधाकिशन पवारांकडील उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून तो डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे दिला आहे.

हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला आयुक्त अमगोथु श्री रंगा नाइक यांच्याकडून केराची टोपली
परिणामी डॉ. राधाकिशन बाबुराव पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे यांना उपसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग), पुणे या पदावर हजर होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे. तर उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राधाकिशन बाबुराव पवार यांचेऐवजी डॉ. प्रशांत वाडीकर, सहायक संचालक (वैद्यकीय) उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला आहे.
आरोग्य मंत्री यांच्याकडून निलंबन आणि बडतर्फीची कारवाई कधी ?
डॉ. राधाकिशन पवार यांनी आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथे उपसंचालक पदावर कार्यरत असताना डायरेक्टरचे अधिकार स्वतःकडे घेण्यासाठी थेट शासन निर्णय बदलणे, पुणे विभागाचे उपसंचालक असताना इतर जिल्ह्यातील खरेदी व इतर निर्णयात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे नाव वापरून लुडबुड करणे, बदली, प्रतिनियुक्ती, समावेशन, भरती, औषध-साहित्य खरेदी, आरोग्याशी संबंधीत ठेके देणेयाबाबत नेहमीच वादग्रस्त भुमिका आणि वादग्रस्त निर्णय घेतले. अनेक संघटनांनी त्यांच्याविरोधात थेट आंदोलने केली. सामाजिक संघटनांनी तक्रारी आणि आंदोलन केली. मात्र अद्याप त्यांचे निलंबन केले नाही. मात्र आता उपसंचालक पदावरून हटवल्याने आणखी तक्रारीत वाढ होणार आहे, हे निश्चित. पुणे मनपा आरोग्य विभाग आणि पुणे जि. प. आरोग्य विभागातील अनेक महिलांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत. त्यामुळे सक्षम अशा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून निलंबन आणि बडतर्फीची कारवाई कधी केली जाणार ? जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात आणि डॉ. मनोहर बनसोडे यांच्यानंतर डॉ. राधाकिशन पवार यांच्यावरील पुढील कारवाई कधी ?असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागातून उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते “बेस्ट फार्मासिस्ट” पुरस्काराने प्रवीण सोळंकी यांचा गौरव
सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा, पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने, विजयमाला बेले यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल