– राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे : राम डहाके
Farmers Protest on Diwali Day : केंद्र व राज्यातील सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण व नियोजन शून्य कारभारामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांचे दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर आंदोलन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष तथा आंदोलक काँग्रेस नेते राम डहाके यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मेडसिंगा गावातील शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खाऊन नाकर्ते केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत आंदोलन केले असल्यामुळे याची राज्यभर चर्चा सुरू आहे.
सततचा दुष्काळ, नापिकी, यावर्षीचा अत्यल्प पाऊस, शेती उत्पादनात आलेली प्रचंड घट, शेत मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेला कमी भाव, यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या पिकविम्याची नुकसान भरपाई, अतिवृष्टी, गारपीट अनुदान अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. उलटपक्षी शेतकऱ्यांकडे बँकांनी वसुलीचा तगादा लावला आहे. विहिरीत पाणी नाही, बोअरवेल तलावात अत्यल्प साठा आहे, शेतकऱ्यांनी उधार उसनवारी करून रब्बीची पेरणी केली आहे. परंतु त्यालाही सिंचनासाठी पुरेसा वीज पुरवठा मिळत नाही. तूर, हरबरा, गहू, मका, भाजीपाला यासारखी पिके सुकायला लागली आहेत. वीज केंद्रावर सुरळीत वीज पुरवठा करण्यासंदर्भात शेतकरी गेले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणाचे प्रकार जिल्हाभरात प्रशासनाकडून सर्रास पणे सुरू आहेत. सरकार व वीज कंपनीचे कुठलेही नियोजन नाही. त्यात शेतकऱ्यांच मरण होत आहे.
हे ही वाचा केंद्र आणि राज्यातील नाकर्ते भाजप सरकार विरोधात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
वर्षभराचा संसाराचा गाडा, मुलांचे शिक्षण, आजारपण, मुलीचे लग्न, सावकाराचे कर्ज, या सर्वातून शेतकऱ्यांचे काही कसं होणार? या विवंचनेत शेतकरी असताना दिवाळीला निदान मुलांना नवीन कपडे, गोडधोड, फटाके कसे घेणार ? दिवळी कशी साजरी करावयाची ? शेतकऱ्यांप्रती सूड भावनेने उदासीनता दाखविणाऱ्या सरकारला धडा शिकविणे गरजेचे असून सत्तेच्या सरीपाटात मश्गुल असणाऱ्या निर्दयी सरकारला खाली खेचल्या शिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, अशी घाणाघाती तोफ डागत राम डहाके यांनी शेतकऱ्यांसह दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर आंदोलन करून सरकारचा निषेध केला.
या निर्दयी सरकारला शेतकरी हितासाठी आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारू, असे प्रतिपादन आंदोलन प्रसंगी तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यांनी केले. प्रास्ताविक अक्रम खासाब यांनी तर आभार प्रमोद टेकाळ यांनी मानले.
आंदोलनाप्रसंगी श्याम राठोड, मदन राठोड, नितिन शेजोळ, अशोक जाधव, बाबूराव वानखडे, प्रकाश शेजोळ, सागर शेजोळ, मिलिद शेजोळ, दिलिप वानखडे, मधुकर वानखडे, सुधाकर वानखडे, भगवान शेजोळ, शैलश शेजोळ, तेजरान शेजोळ, जितेंद्र शेजोळ, सतिश राठोड, प्रमोद शेजोळ, विकास शेजोळ, लखन निकम, पंजाबराव वानखडे, सुनिल नालखंड, साहेबराव वानखडे, सिद्धार्थ रोजीक, सुनिल शेजोळ, सादिव शेजोळ, राजु वानखेड, निमराव वानखेडे, भिमराव शेजोळ, राजु शेजोळ, शामराम वानखडे यांचेसह मेडसिंगा गावातील बहुसंख्य शेतकरी, महिला व तरुण उपस्थित होते.
Farmers Protest on Diwali Day
हे ही वाचा महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक: गैरहजर अभियंत्यांच्या खुर्चीला चिटकविले निवेदन
Thieves also celebrated Diwali | चोरट्यांनीही साजरी केली दिवाळी
Lek Ladki Yojana | मुलींना १८ वर्ष पूर्ण होताच मिळणार ७५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती…
(दैनंदिन महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी “सत्ताकारण”च्या अधिकृत WhatsApp Channel ला फॉलो करा.)