– वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जावेद लालू पटेल यांची तक्रार
सोलापूर : प्रतिनिधी
एन. एच. एम आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कॉम्प्युटर ऑपरेटर नागेश चौधरी यांना कंत्राटी सेवेतुन (Service) कार्यमुक्त केले होते. असे असताना पुन्हा चौधरी यांना गैरप्रकारे सेवेत सामावून घेतले आहे. त्यामुळे नागेश चौधरींना त्वरीत सेवेतून कमी करा, अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे महासचिव जावेद लालू पटेल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, एन. एच. एम. आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कॉम्प्युटर ऑपरेटर नागेश चौधरी यांच्या विरोधात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांच्याकडे अनेक लेखी व तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावित कलेल्या नस्तीनुसार 4 जुलै 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागेश चौधरी यांना सेवेतुन (Service) कार्यमुक्त केले होते.
नागेश चौधर हे सेवेत (Service) असताना फाईल गहाळ करणे, दस्तावेजामध्ये खाडाखोड करणे, नस्तीमध्ये विसंगती निर्माण करणे, शासकिय कामामध्ये बाधा आणणे, नस्तीमधील नोटींगकरीता दिशाभुल सल्ला देणे, वरीष्ठ अधिकारी यांच्याशी उच्च आवाजात व आरेरावीची भाषेमध्ये बोलणे, कार्यालयातील महत्वाच्या बावी व माहीतीचे फोटो, झेरॉक्स काढून त्रयस्त व्यक्तीस देणे आदी प्रकारच्या गंभीर स्वरुपाच्या चुका नागेश चौधरी यांच्या मार्फत झालेल्या आहेत.
या सर्व प्रकरणामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी प्रस्तावित कलेल्या नस्तीनुसार 4 जुलै 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागेश चौधरी यांना सेवेतुन (Service) कार्यमुक्त केले होते. मात्र काही कालावधी नंतर नागेश चौधरी यांनी झालेल्या चुकांचा स्वीकार करुन व माफीनामा लिहुन दिल्यानंतर त्यांना परत कामावर घेण्यात आले.
वास्तविक पाहता नागेश चौधरी यांच्या विरोधात एवढे गंभीर आरोप असताना परत कामावर कसे काय घेण्यात आले ? तसेच यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशय आहे. नागेश चौधरी यांना परत सेवेत (Service) घेताना त्यांना मुळ मानधनावर घेण्यात आले होते व मानधन संरक्षितेचा लाभही घेणार नसल्याचे चौधरी यांनी मान्य केले होते. असे असताना चौधरी यांनी परत चालु मानधन कसे काय देण्यात येत आहे ? शासनामध्ये काम करून शासकीय फाईल गहाळ करणे, दस्तऐवजामध्ये खाडाखोड करणे, नस्तीमध्ये विसंगती निर्माण करणे, शासकिय कामामध्ये बाधा आणणे अशा गंभीर चुका करणाऱ्या व्यक्तीच्या हातुन भविष्यात शासनाचे आर्थिक नुकसान किंवा आर्थिक गैरव्यवहार अथवा इतर कर्मचा-यांच्या फाईलमध्ये फेरफार करुन नुकसान करण्याची शक्यता आहे. तसेच नागेश चौधरी हे कामावर असताना जि. प. सदस्य, राजकिय पदाधिकारी यांच्यामार्फत अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असतात. हे ही त्यांनी मान्य केलेले आहे. त्याचबरोबर नागेश चौधरी हे कार्यालयीन वेळेत सतत वैयक्तीक कामे करित असताना दिसतात. नागेश चौधरी हे जिल्हा लेखा व्यवस्थापक कक्षाकडे काम करीत असल्याने व करोडो रुपयांचा निधी असल्याने आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागेश चौधरी यांना सेवेतुन तत्काळ कमी करावे. तसेच सदरील प्रकरणात न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जावेद लालू पटेल यांनी दिला आहे. मात्र दुसरीकडे सदरच्या तक्रारीस 2 वर्षे होत आली असताना चौधरी यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे यामध्ये वरिष्ठ अधिकारी सामिल आहेत का ? असा प्रश्न जिल्हा परिषद व आरोग्य विभागातून उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा
Corona vaccine | कोरोना काळात लस साठा वाया गेल्याने डॉ. पिंपळे यांच्यावर कारवाई करा
Corruption of Recruitment | नोकर भरतीतील पेपर फोडण्यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार