सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सोलापूर शहर-जिल्हा मेडिकल हब म्हणून ओळखला जातो. येथील शासकीय रूग्णालयात शहर-जिल्ह्याबरोबरच लातूर, उस्मानाबाद आदी परजिल्ह्यातून तसेच विजापूर, गुलबर्गा अशा परराज्यातून रूग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे उत्तम रूग्ण सेवा आणि रूग्णालयांच्या अत्याधुनिकरणासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे, असे निर्धार नवनियुक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी “सत्ताकारण”शी बोलताना व्यक्त केला.
हे ही वाचा आरोग्य सेवा पुणे उपसंचालक पदी डॉ. भगवान अंतु पवार यांची नियुक्ती
सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमित बदल्या केल्या जात आहेत. याममध्ये जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांची तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई मंडळ, ठाणे येथे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदी प्रशासकीय कारणास्तव बदली केली आहे. त्यांच्या ठिकाणी रिक्त होणाऱ्या पदी ग्रामीण रूग्णालय जुन्नर येथे कार्यरत वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा डोईफोडे यांची नियुक्ती जिल्हा शल्य चिकीत्सक या पदावर जिल्हा रूग्णालयात केली आहे. तसा आदेश उपसचिव दिपक केंद्रे यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी पारित केला. तर 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सदर पदाचा पदभार स्विकारून कामकाजास सुरवात केली आहे. पदभार स्विकारताच त्यांच्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
यावेळी नवनियुक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डोईफोडे म्हणाल्या, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सर्वच अधिकाऱ्यांना रूग्णसेवा आणि रूग्णालयांच्या अत्याधुनिकरणासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना आहेत. त्यादृष्टीने काम करण्यासाठी अधिकार दिले असून पाठींबाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा रूग्णालय, महिला व बाल रूग्णालय आणि अधिनस्त 16 ग्रामीण आणि 3 उपजिल्हा रुग्णालयात आणखी अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडूनही जिल्हा नियोजन समितीमधून रूग्णालयाच्या विकासासाठी निधी मंजुर करून घेण्यासाठी प्रयत्न राहतील. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, असे मत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी व्यक्त केले. तसेच आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही, याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक पदी डॉ. प्रशांत वाडीकर यांची नियुक्ती