सत्ताकारण न्यूज नेटवर्क : रणजित वाघमारे
‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ प्रकरणाचा लाभ मिळण्यासाठी यातील जवळपास 1300 वैद्यकीय अधिकारी 2009 पासून प्रयत्न करत होते. परंतु पावलोपावली वसुलदारांच्या कार्यरत टोळीमुळे अनके वैद्यकीय अधिकारी यापासून वंचित होते. पूर्वी ज्यांनी 4 लाख रुपये भरले, अशाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु आजही यापासून कित्येक अधिकारी वंचित असल्याची बाब आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना लक्षात आली. त्यावेळी त्यांनी कोणाचा एकही रुपया न घेता, 15 वर्षांपासून वंचित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’चा लाभ मिळवून दिला. आज याच ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’चे मंजूर झालेले प्रस्ताव आणि त्याबाबतचे शासनाचे आदेशाचे पत्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज दुपारी 4 वाजता आरोग्य भवन येथे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या धाडसी निर्णयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत केले असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हे ही वाचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरतीत 50 कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार ?
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या विषयी एक धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी व पूर्तता आज दि. 3 डिसेंबर 2025 रोजी करण्याचे ठरविले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेब्रुवारी 2009 मध्ये शासन निर्णयानुसार एक वेळचे समावेशन म्हणून शासन सेवेत कायम करण्यात आले. परंतु सेवा कायम करताना शासन निर्णयातील काही जाचक अटीमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. या त्रासातून मुक्तता करणे कामी वैद्यकीय अधिकारी सातत्याने संघर्ष करत होते. त्याचा परिणाम म्हणून मागील युती सरकारच्या अंतिम टप्प्यातील कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हिताचे विविध शासन निर्णयास मंजुरी देण्यात आली. त्याप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेत लागल्यापासून सेवा धरण्यात आली व तांत्रिक खंड हा क्षमापित करून सलग सेवा धरण्याचा शासन निर्णय झाला. याचा फायदा समावेशित वैद्यकीय अधिकाऱ्यांना झाला. एकूण 1300 समाविष्ट वैद्यकीय अधिकारी शासन सेवेत कार्यरत होते. या शासन निर्णयानंतर त्याची अंमलबजावणी करणे, प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नावाने स्वतंत्र सेवा खंड क्षमापनाचे शासन निर्णय जारी करणे गरजेचे होते. त्याकामी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मग्मो संघटनेने पुढाकार घेतला आणि तत्कालीन आरोग्य मंत्री तसेच मंत्रालयातील तत्कालीन सर्व कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी यांच्या सर्वांच्या संगमताने वैद्यकीय अधिकारी यांची पुनश्य आर्थिक पिळवणूक सुरू झाली. प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र शासन निर्णय कामी मग्मो संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांच्याकडून सर्व जिल्हा अध्यक्ष, सचिव यांना निरोप देऊन प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रत्येकी 4 लाख रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 4 लाख रुपये जमा झाले होते. अशाच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवा खंड क्षमापनाचे स्वतंत्र शासन निर्णय पारित करण्यात आले. अशा प्रकारे साधारणता 800 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शासन निर्णय निर्गमित केले. उर्वरित जवळपास 400 ते 500 वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही तसेच शासनाकडे अहवाल पूर्तता केली असतानाही, केवळ चार लाख रुपये न दिल्यामुळे सेवा खंड क्षमापनाचे आदेश मंत्रालयातील बाबू मंडळी देत नव्हते. या सर्व बाबी वारंवार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार मंत्रालय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परंतु निरढावलेल्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे वारंवार टाळले होते. कारण मंत्रिमहोदयाच्या आदेशानुसार कोणतीही आर्थिक देवाण घेवाण करता येणार नव्हती. परंतु आरोग्यमंत्री यांनी हा विषय कोणाचाही एक रुपयाही न घेता पूर्ण करण्याचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार त्यांचे पीएस मंगेश शिंदे, OSD डॉ. अंबादास देवमाने, डॉ. अमोल भोर, शिवदास, मगर यांनी पूर्णपणे नियोजन करून उर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणताही एकही रुपया न घेता सेवा खंड क्षमापनाचे आदेश देणे कामी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून आज दि. 3 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील 150 समावेशित वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचे खंड क्षमापित झाल्याच्या शासन निर्णयाचे पत्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आज दीडशे वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचे खंड क्षमापनाचे पत्र त्यांच्या स्वाधीन करण्याचे नियोजन आरोग्य भवन मुंबई येथे दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. या धाडसी निर्णयाबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आरोग्य खात्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अभिनंदन करण्यात येत आहे. मंत्रालय स्तरावरील आर्थिक भ्रष्टाचाराची साखळी खंडित करण्याचा किंवा मोडीत काढण्याचा प्रयत्न आरोग्य मंत्री यांनी केला आहे. तो यशस्वी करून दाखवला आहे. त्याबद्दल आरोग्य मंत्री यांचे विशेष अभिनंदन आणि आभार यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मानले आहेत. यापुढेही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्तता करतील आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा सर्वसामान्य जनतेला दर्जात्मक आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करतील, अशी भावना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा बोगस “प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती”चा मुद्दा भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या निशाण्यावर
11 हजारहून अधिक मुलांवर मोफत ह्दयरोग व इतर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न
आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार





