प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे छावा संघटनेची मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
Transfer | जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सोलापूर येथे कार्यरत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे गेल्या 25 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी सन 1996 पासून गेली सलग 25 वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्यामुळे त्यांचे अनेक लोकांशी लागेबंधे तयार झाले आहेत. याचा गैरफायदा घेत ते प्रचंड प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार करीत असून त्यांनी अवैध मार्गाने संपत्ती गोळा केलेली आहे, तरी त्यांची जिल्हा बाह्य बदली करून चौकशीअंती त्यांना बडतर्फ (Dismiss) करा, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी मेलव्दारे केली आहे.
तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, डॉ. पिंपळे हे प्रा. आ. केंद्र वेळापुर, तालुका आरोग्य अधिकारी माळशिरस व त्यानंतर प्रा. आ. केंद्र पिलीव या एकाच माळशिरस तालुक्यात त्यांनी नोकरी केलेली आहे. 2017 पासून ते परत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी या पदावर सोलापूर जिल्ह्यातच ठाण मांडून बसलेले आहेत.
डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे (Dr. Aniruddh Pimpale) यांनी तालुका आरोग्य अधिकारी माळशिरस येथे सन २००९ ते २०१४ या कालावधीत प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे सन २००९ ते २०१४ या कालावधीत डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी. Transfer
डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे सन २०१७ पासून जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्याने त्यांना त्यांच्या मुळ पदाची कर्तव्ये पार पाडून अतिरिक्त कार्यभार सांभाळणे आवश्यक होते. परंतु ते सन २०१७ पासून एकदाही त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी फिरकले नाहीत. असे असताना त्यांचे त्यांच्या वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) प्रा. आ. केंद्र पिलीव, ता. माळशिरस या स्थानापन्न पदावरील वेतन तेथे कोणतेही काम केले नसतानाही, सध्या निलंबित (Suspended) असलेले तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव (Dr. Shitalkumar Jadhav) यांनी मनमानी पणे अदा केलेले आहे. Transfer
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी अनेक माता व अर्भक व बाल मृत्यू होत आहेत. या सर्व मृत्यूची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी या कामी सतत दुर्लक्ष केले आहे. केवळ काही ठराविक माता मृत्यू व बालक मृत्यू यांची माहिती सादर करून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व मा. जिल्हाधिकारी (Collector) यांची दिशाभूल केली आहे. तज्ञ व अधिकारी यांनी सुचविलेल्या उपाय योजना याबाबत कारवाई केली जात नाही. त्याच त्याच टाळण्यायोग्य कारणामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर माता मृत्यू व बाल मृत्यू होत आहेत. याबबात सखोल चौकशी करून माता मृत्यू व बालक मृत्यू यांच्या करीता डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांचे वर जबाबदारी निश्चित करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.
मा. तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) हे आरोग्य विभागाचे आयुक्त असताना त्यांनी सर्व प्रकारच्या प्रतिनियुक्ति रद्द केलेल्या होत्या. असे असतांनाही आज ही सोलापूर जिल्ह्यात अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणा ऐवजी इतरत्र काम करीत आहेत. अश्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते ठराविक टक्केवारी घेवून अदा केले जात आहेत. जि. प. आरोग्य विभागात गेले १० वर्ष श्री. रफीक शेख हे ठाण मांडून बसले आहेत. त्यांची मूळ नेमणूक बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून आहे. त्यांनी त्यांच्या नेमून दिलेल्या गावात रोज घरोघरी जावून सर्वेक्षण करणे हे त्यांचे काम आहे. त्याकरीता त्यांना त्याचा भत्ता ही न चुकता अदा केला जातो. परंतु गेली कित्येक वर्ष श्री. रफीक शेख हे शासनाच्या कोणत्याही मान्यतेशीवाय जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी या पदावर काम करत आहेत. ते गेल्या १० वर्षात एकदाही त्यांच्या कार्यक्षेत्रात गेले नाहीत. सर्व सामान्य एखादा क्षेत्रीय कर्मचारी पेंशन फंड या कामासाठी जिल्हया मुख्यालयात आल्यावर त्यांना रजा टाकून आला का ? असे दरडवून विचारणारे डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे श्री. रफीक शेख यांच्याशी असलेल्या अर्थपूर्ण सबंधामुळे गप्प असतात. श्री. रफीक शेख हे वेगवेगळ्या वृत्तपत्र प्रतिनिधि यांचेशी अर्थपूर्ण सबंध ठेवून आहेत. यामुळे व आर्थिक देवाण घेवाण यामुळे श्री. रफीक शेख यांच्या नियमबाह्य कामकाजाकडे डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. तरी महोदय, डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे आणि रफीक शेख यांची वरील नमूद केलेल्या तक्रारीमुद्द्यानुसार चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव (Principal Secretary) संजय खंदारे (Sanjay Khandare) यांच्याकडे छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी मेलव्दारे शुक्रवारी केली आहे. Transfer
नेहमीच चर्चेतील आरोग्य विभाग
एकीकडे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य सभापती, सदस्य तसेच जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष मनिष काळजे यांनी डॉ. शितलकुमार जाधव यांच्याविरोधात आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिवांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी डॉ. जाधव यांना निलंबीत (suspende) केले आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. अशातच कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्याविरोधात सध्या तक्रारी सुरू असल्याने पुन्हा आरोग्य विभाग (Department of Health) चर्चेत आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्याविरोधात जिल्हाबाह्य बदली आणि बडतर्फची () मागणी करत छावा संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेला आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत आला असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे. Transfer
हे ही वाचा
Public Health Committee | जिल्ह्यात “जन आरोग्य समिती”च राम भरोसे
China On Apple | चिनमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना iphone वापरण्यास बंदी ?