– प्रधान सचिवांकडे छावा संघटनेने केली होती कारवाईची मागणी
– संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे आक्रमक
सोलापूर : प्रतिनिधी
Report : जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर येथे गेल्या 25 वर्षांपासून जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे कार्यरत आहेत. त्यांनी या कार्यकाळात अवैध मार्गाने संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे त्यांची जिल्हा बाह्य बदली करून चौकशीअंती त्यांना बडतर्फ करण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी मेलव्दारे केली होती. यावर प्रतिक्रीया विचारली असता प्रधान सचिव खंदारे यांनी डॉ. पिंपळेंचा अहवाल (Report) मागवून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे “सत्ताकारण न्युज नेटवर्क”ला सांगितले.
हे ही वाचा Corona vaccine | कोरोना काळात लस साठा वाया गेल्याने डॉ. पिंपळे यांच्यावर कारवाई करा
छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश मोरे हे आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सोलापूर येथे कार्यरत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मोरे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, डॉ. पिंपळे हे गेल्या 25 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी सन 1996 पासून गेली सलग 25 वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्यामुळे त्यांचे अनेक लोकांशी लागेबंधे तयार झाले आहेत. याचा गैरफायदा घेत ते प्रचंड प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार करीत असून त्यांनी अवैध मार्गाने संपत्ती गोळा केलेली आहे. डोगणगांव, अकलूज, वेळापूर, उस्मानाबाद येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. तरी त्यांची जिल्हा बाह्य बदली करून चौकशीअंती त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश मोरे यांनी मेलव्दारे केली होती.Report
हे ही वाचा Transfer | 25 वर्षे एकाच जिल्ह्यात असलेल्या डॉ. पिंपळेंची जिल्हाबाह्य बदली करा
डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे हे सन २०१७ पासून जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्याने त्यांना त्यांच्या मुळ पदाची कर्तव्ये पार पाडून अतिरिक्त कार्यभार सांभाळणे आवश्यक होते. परंतु ते सन २०१७ पासून एकदाही त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी फिरकले नाहीत. असे असताना त्यांचे त्यांच्या वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) प्रा. आ. केंद्र पिलीव, ता. माळशिरस या स्थानापन्न पदावरील वेतन तेथे कोणतेही काम केले नसतानाही, सध्या निलंबित (Suspended) असलेले तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव (Dr. Shitalkumar Jadhav) यांनी मनमानी पणे अदा केलेले आहे.Report
हे ही वाचा Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी अनेक माता व अर्भक व बाल मृत्यू होत आहेत. या सर्व मृत्यूची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांनी या कामी सतत दुर्लक्ष केले आहे. केवळ काही ठराविक माता मृत्यू व बालक मृत्यू यांची माहिती सादर करून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व मा. जिल्हाधिकारी (Collector) यांची दिशाभूल केली आहे. तज्ञ व अधिकारी यांनी सुचविलेल्या उपाय योजना याबाबत कारवाई केली जात नाही. त्याच त्याच टाळण्यायोग्य कारणामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर माता मृत्यू व बाल मृत्यू होत आहेत. याबबात सखोल चौकशी करून माता मृत्यू व बालक मृत्यू यांच्या करीता डॉ. अनिरुद्ध नंदकूमार पिंपळे यांचे वर जबाबदारी निश्चित करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात यावी. याची दखल घेत प्रधान सचिव यांनी अहवाल मागवून करावाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. Report
हे ही वाचा Inquiry Committee | लस भांडार उभारण्यात कुचराई केल्याबद्दल आयुक्तांनी नेमली चौकशी समिती