भाग 3 : रणजित वाघमारे
आरोग्य मंत्री निवडणुकीत व्यस्त असल्याचा गैरफायदा आरोग्य विभागातील बीडच्या भुमी पुत्राने आणि कात्रज कार्यालयातील एका पीए ने घेतला. परिणामी आरोग्य मंत्र्यांच्या नावे पुणे सर्कलमध्ये परस्पर “Sweet Message” पाठवून पुणे सर्कलमधील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु या तीन जिल्ह्यातील काही नाराज डॉक्टरांनी “सत्ताकारण”कडे धाव घेतली. “सत्ताकारण”ने सदरची बातमी प्रकाशीत केली. परिणामी वसुलीचा भांडाफोड झाल्याने सध्या स्वयंघोषीत वसुलदारांनी वसुली थांबवली आहे. तर दुसरीकडे स्वयंघोषीत वसुलदारांच्या विरोधात विरोधातील डॉक्टर संजय राऊत, रोहीत पवार आणि ACB च्या दारी पोहचले असल्याची माहिती यातील काही डॉक्टरांनी दिली.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
बीड च्या भुमी पुत्राने आणि कात्रज कार्यालयातील एका पीए ने आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे. येत्या निवडणुकीत त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे पुणे सर्कलमधील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक आणि सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये, सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 1 लाख रूपये जमा करण्याचा “Sweet Message” यातील सर्वांना पाठविला. यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील संबंधीत सर्वांनी तत्काळ “Sweet Message”ची पूर्तता करण्याचे आवाहनही WhatsApp Call आणि WhatsApp Msg वरून करण्यात आले होते. परिणामी यातील अनेक डॉक्टरांनी “Sweet Message”ची पूर्तता करण्यास सुरवात केली. परंतु सध्या “Sweet Message”चा भांडाफोड झाल्याने यातील स्वयंघोषीत वसुलदार खुप अस्वस्थ आहेत.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या CM पदासाठी स्वयंघोषीत वसुलदारांकडून 2 कोटींचा “Sweet Message” परस्पर व्हायरल
बीड च्या भुमी पुत्राने आणि कात्रज कार्यालयातील एका पीए ने आरोग्य मंत्र्यांच्या नावे परस्पर “उद्योग” सुरू केल्याचे बहुतांश डॉक्टरांना समजले. परिणामी स्वयंघोषीत वसुलदारांच्या विरोधात विरोधातील डॉक्टर हे संजय राऊत, रोहीत पवार आणि ACB च्या दारी तक्रार घेऊन पोहचले आहेत. याबरोबरच यातील डॉक्टरांनी सध्या यापूर्वी केलेल्या भरती, पदोन्नती, बदल्या, मर्जीतील ठिकाणी नियुक्त्या, औषध खरेदी आदी प्रकारातील टक्केवारी आणि त्या त्या रेटकार्ड नुसार वसुली केलेल्या रकमासह लेखी तक्रारी तयार केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात स्वयंघोषीत वसुलदारांच्या परस्पर अनेक वसुली प्रकरणांमुळे आरोग्य मंत्र्यांचे मंत्री पद गेल्यानंतर खुद्द आरोग्य मंत्री अडचणीत येण्यार असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे.
क्रमशः
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण
MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही IEC चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडे