सोलापूर : प्रतिनिधी
Distribution food : सोमवारी, 2 आँक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत साजरी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ आणि पदाधिकाऱ्यांनी एचआयव्ही बाधित मुलांना अन्नधान्याचे किट वापट केले.
महानगरपालिका कॉन्टॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ, देविदास धोत्रे यांच्याकडून यावेळी 30 किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सागर राठोड, शंकर ढोले, सोमनाथ गायकवाड, मारुती पवार, विजयकुमार बेंद्रे, सुनील दुधगंडी, विनोद बोरकर, उमेश गायकवाड, राऊत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या किटमध्ये तीन किलो गहू, दोन किलो बासमती तांदूळ, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो शेंगा, अर्धा किलो पोहे, अर्धा किलो मूग डाळ, अर्धा किलो मटकी, हरभरा डाळ अर्धा किलो, बिस्कीट पुडे 12 नग, साबण, राजगिरा लाडू आदी पौष्टीक साहित्यांचा समावेश होता.
यावेळी अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी समाजातील गरजू, वंचीतांना आधार देण्याचा प्रयत्न पूर्वीपासून असून यापुढेही सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. तसेच गरजूंसाठी समाजातील युवा पिढीने देखील पुढे येण्याचे आवाहन यावेळी अध्यक्ष दुधाळ यांनी केले.
यावेळी संकल्प फौंडेशनचे किरण लोंढे यांनी सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आभार मानत संकल्प युथ फौंडेशनच्या कार्याविषयी अधिक माहिती दिली. (Distribution food)
हे ही वाचा
आजचे राशीभविष्य 3 ऑक्टोबर 2023 | Today Horoscope
Ganapath Movie Teaser | टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉन च्या ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर रिलीज