सोलापूर : प्रतिनिधी
आस्था सामाजिक संस्था संचलित आस्था रोटी बँकेच्यावतीने शहरातील गरीब, निराधार, बेघर, वंचित व दृष्टीहीन अशा 100 महिला-पुरुषांना ब्लँकेटचे वाटप आज करण्यात आले. यामुळे संबंधीत बांधवांना ऐन थंडीच्या दिवसात मायेची उब मिळणार आहे.

सध्या राज्यासह जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. रस्त्यावरील बेघर, निराधार, वंचित अशा स्त्री व पुरुषांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेट गरजेचे आहे. हीच गरज ओळखून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आस्था रोटी बँकेने पुढाकार घेतला आहे.
हे ही वाचा सोशल मीडियावर Raha Kapoor चीच चर्चा; Ranbir-Aaliaने पहिल्यांदाच दाखवला चेहरा
यावेळी आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव सुहास छंचुरे, पिंटू कस्तुरे, सिद्धू बेऊर उपस्थित होते. आस्था रोटी बँकेकडून सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात नेहमीच सहकार्याची भावना ठेवून योगदान दिले जाते. त्यामुळे गरजूंनी आनंद तालिकोटी यांच्याशी (9422644555) संपर्क साधण्याचे अवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
हे ही वाचा Recruitment | 70 ऐजवी 80 टक्के पदभरती लवकरात लवकर करावी
सामाजिक कार्यासाठी रोटी बँकेचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा, उपाध्यक्ष आनंद तालिकोटी, सुहास छंचुरे, सहसचिव पळसदेवकर, संचालक अनिल जमगे, सल्लागार डॉ. महावीर शास्त्री, बसवराज मठपती, कामिनी गांधी, माया पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
हे ही वाचा तर राज्यात निवडणूका होऊ देणार नाही : मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा