Dhangar Reservation | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी नुकतेच उपोषण सोडले आहे. मात्र सरकारला महिनाभराचा कालावधी दिला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने सरकारला घेरले असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झाला आहे.
यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) 6 सप्टेंबरपासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणाचा आज 16 वा दिवस असून संसदेत विशेष महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणासाठी आदेश काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा धनगर समाजाने घेतला आहे. Dhangar Reservation
धनगराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून आज (२१ सप्टेंबर) रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील सह्याद्र अतिथीगृहात ही बैठक पार पडेल. लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदि नेते उपस्थित आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत कर्मचारी आणि शिक्षणाची मदत द्या, अशी धनगर समाजाची मागणी आहे. Dhangar Reservation
धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (ST) आरक्षण द्यावे, अशी समाजाची मागणी आहे. धनगर समाजाला सध्या भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण देण्यात आले आहे.