सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
आरोग्य विभागात घडेल ते नवलच ! हे नेहमीचेच आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आरोग्य विभागातील “राखी सावंत”ने आपला विभाग आणि कार्यक्षेत्र नसताना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिन असणाऱ्या एका ब्लड बँकेचा प्लाझ्मा हस्तगत केला. आणि तो पुन्हा त्याच ब्लड बँकेच्या स्वाधीन करण्यासाठी 25 लाख रूपये द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची डरकाळी फोडली. परंतु अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ब्लड बँकेच्या संचालक मंडळास सांगितले की, त्या विभागाचा आपल्या विभागाशी काहीही संबंध नाही. ते कारवाई करू शकत नाहीत. वरून आपल्याकडील सर्व कागदपत्रे नियमानुसार परिपूर्ण आहेत. मात्र राखी सावंतला जन्मजातच पैशांचा मोह असल्याने त्यांनी ब्लड बँकेच्या संचालकास वेठीस धरले. “आरोग्य मंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तुम्हाला कारवाई टाळावयाची असेल तर आरोग्य मंत्र्यांना 25 लाख रूपये द्या”, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांच्या नावे केली, आणि सदरचा प्लाझ्मा अधिकार नसतानाही स्वतःच्या ताब्यात ठेवला. उद्या बाजार समितीमधील भाजीविक्रेत्यावरही राखी सावंत अधिकार नसताना कारवाई करणार का ? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. परंतु दुसरीकडे आरोग्य विभागात स्वच्छ प्रतिमा असलेल्या आरोग्य मंत्र्यांच्या नावे, आरोग्य विभागातील “राखी सावंत”कडून धडधडीत 25 लाख रूपयांची मागणी केलीच कशी जात आहे. राखी सावंतच्या या अजब कारभारला आरोग्य मंत्र्यांची संमती आहे कींवा नाही ? हे पुढील कारवाईवरून लक्षात येणार आहे.
हेही वाचा सोलापूरातील आरोग्य सेवांचे आणखी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार
घडलेली घटना अशी की, एका सामाजिक कार्यकर्त्याने शहरातील गजबजलेल्या चौकात गुजरातला जाणारा प्लाझ्मा पकडला. तो बेकायदेशीररित्या तस्करी होत असल्याचा आरोपही त्या सामाजिक कार्यकत्याने करत पोलिसांना खबर दिली. परंतु तेथे हजर झाली ती आरोग्य विभागातील “राखी सावंत”. त्यानंतर पोहचले पोलिस अधिकारी. मात्र पोलिसांनी सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आपल्याला कारवाईचे अधिकार नाहीत, असे म्हणत पोलिसांनी प्लाझ्माचा टेम्पो सोडून दिला. परंतु अधिकार आणि कार्यक्षेत्र नसतानाही आरोग्य विभागातील “राखी सावंत”ने तो टेम्पो ताब्यात ठेवला. मात्र टेम्पोमध्येच प्लाझ्मा दिर्घकाळ राहील्यास खराब होईल, म्हणून तो ताब्यात घेतलेला प्लाझ्माचा टेम्पो सिव्हील हॉस्पिटलमधील ब्लड बँकेकडे पाठवला. मात्र “आम्ही कारवाई केली नाही, आमची जबाबदारी नाही”, असे म्हणत तेथील ब्लड बँकेत प्लाझ्मा ठेवण्यास डीन यांनी नकार दिला. परिणामी राखी सावंतची पंचाईत झाली. परंतु प्रश्न 25 लाखांचा. मग काय ? महापालिकेच्या दवाखान्यातील एका ॲम्ब्युलन्समध्ये थर्मकॉलचे बॉक्स आणि त्यात बर्फाचे खडे टाकून प्लाझ्माच्या बॅग त्यात रात्रभर ठेवल्या. दुसरीकडे 25 लाखांची बोलणी सुरूच. परंतु प्रयत्नांना आणि कष्ठाला 25 लाखांचे फळ काही लागेना. ब्लड बँकेच्या संचालकांनी 25 लाख तर सोडाच, परंतु आम्हाला जप्त केलेला प्लाझ्माच नको, अशी भुमिका घेतली. तसेच प्लाझ्मा खराब झाल्यास आम्ही कायदेशीर भुमिका घेऊ असेही सांगितले. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्यापर्यंत विषय पोहचवला. तसाच तो आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापर्यंतही विषय गेला. चुकीच्या कारवाईमुळे राखी सावंत वर राजकीय दबाव वाढला. वाढलेल्या दबावात ॲम्ब्युलन्समधील थर्मकॉलच्या बॉक्समधील बर्फाचे खडे आणि प्लाझ्माच्या बॅग वितळत होत्या. राखी सावंतची मात्र आग झाली…
कारवाई टाळण्यासाठी “आरोग्य मंत्र्यांना 5 तोळे गोल्ड कॉईन…”
राखी सावंतचे प्लाझ्मा प्रकरणाच्या आगोदरही हॉस्पिटलवरील कारवाईच्या नावाखाली वसुली, आशांना नाहक त्रास आदी विविध तक्रारी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. गैरप्रकाराला थारा न देणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी कारवाईची फाईल तयार करायला सांगितली. याची माहिती एका OSD यांनी राखी सावंतला दिली. राखी सावंत ने कारवाई टाळण्यासाठी आरोग्य भवनच्या तिसऱ्या मजल्यावरील एका OSD च्या हाती आरोग्य मंत्र्यांसाठी 5 तोळे गोल्डचे कॉईन सोपविले. परंतु स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असलेल्या आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि त्यांचे बंधु अर्जुन आबिटकर यांच्यापर्यंत हे गोल्ड कॉईन थोडीच पोहचले असणार आहे ? त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून आता राखी सावंतच्या फाईलवर त्या OSD मार्फत ठेवलेले 5 तोळे गोल्डचे कॉईन बाजूला सारून काय कारवाई होईल ? याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष लागले आहे.
उद्या वाचा : राखी सावंत, पद्मीणी हॉस्पिटल आणि 1 कोटीची वसुली…
हेही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
DHO डॉ. संतोष नवले आणि CS डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा




