– अन्यथा सरकारला फटाके लावू, सविता मुंढे यांचा ईशारा
सिंदखेड राजा : प्रतिनिधी
केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे, फडणवीस व अजित पवार गट सत्तेवर आल्यापासून केवळ घोषणाबाजी शिवाय काही करत नाही. शेतकऱ्यांसाठीही काहीच करत नाहीत. यावर्षी अत्यल्प पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ आहे. मात्र हे सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता दिवाळी सारखा पवित्र सण साजरा करण्याची लोकांची मानसिकता नाही, अश्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही, तर या दिवाळीत सरकारला फटाके लावू, असा खणखणीत ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविता मुंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारला दिला आहे.
दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, यावर्षी पाऊस नसल्यामुळे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याअभावी जनतेचे व मुक्या जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु दगडाचं काळीज असणाऱ्या या लोक प्रतिनिधींना जनतेची कसलीही काळजी नाही.
हे ही वाचा मोदींना 9 वर्षात 18 कोटी रोजगारांच्या आश्वासनांचा पडला विसर – राहुल बोंद्रे
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला, मात्र सत्ता उपभोगत असलेले वैयक्तिक कामासाठी मंत्रालयाचे उंबरे झिजवणारे लोकप्रतिनिधी, आपल्या तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यात व्हावा यासाठी प्रयत्न करतांना कुठेच दिसले नाहीत. हे आपल्या तालुक्याच खूप मोठ दुर्दैव आहे. मतदार संघाला अकार्यक्षम लोक प्रतिनिधींना या तालुक्यातील जनता कधीच माफ करणार नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत जर कोरडा दुष्काळ जाहीर केला नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करून दिवाळीला सरकारला फटाके लावू, असा खणखणीत ईशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे सविता मुंढे यांनी दिला आहे.
हे ही वाचा सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ : रविकांत तुपकर