दै. तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने यांना मुख्य संपादकपदी पदोन्नती देण्यात आली. दै. तरुण भारतचे चेअरमन तथा ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी आणि कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांनी याबाबत आज घोषणा करून प्रशांत माने यांचा सन्मान केला.
दै. तरुण भारतच्या सर्व माजी संपादकांचा सन्मान आणि आजी-माजी कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवारी पार पडला. याप्रसंगी निवासी संपादक प्रशांत माने यांच्या पदोन्नतीची घोषणा करण्यात आली. मुख्य संपादकपदी पदोन्नतीबाबत प्रशांत माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.