सत्ताकारण न्युज नेटवर्क
Crime News : पोलीस ठाणे फेज-1 परिसरातील सेक्टर 8 मध्ये डॉक्टरकडूनच शेजारी राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर रूग्णालयातच जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
सध्या भारतात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दिवसेंदिवस हत्या, आत्महत्या आणि बलात्काराची नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. अशावेळी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Uttar Pradesh Noida Crime News Doctor Raped Minor Girl In Clinic)
सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी डॉक्टर सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
हे ही वाचा Crime News | पती-पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या
याबाबत पोलीस उपायुक्त हरीश चंद्र यांनी सांगितले की, ‘आरोपी डॉक्टर शहजाद (वय 40 वर्षे) हा पोलीस स्टेशन फेज-1 परिसरातील सेक्टर 8 मध्ये त्याचा दवाखाना चालवत होता. त्याने शेजारी राहणाऱ्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या दवाखान्यात बोलावून घेतले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा घटनेनंतर संबंधीत डॉक्टरने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळ काढला. मात्र पिडित मुलीने कुटुंबीयांना याची माहिती दिली.
हे ही वाचा Nagpur Crime News | मोबाईलवर बोलताना ७ व्या मजल्यावरून कोसळला थेट खाली
पोलीस उपायुक्त हरीश चंद्र यांनी पुढे म्हणाले, ‘या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 3 पथके आरोपीच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहेत. या घटनेमुळे नोएडात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. संबंधीत डॉक्टरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी येथील लोकांनी केली आहे.
हे ही वाचा Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण मागे, सरकारला पुन्हा दिला अल्टिमेट