सोलापूर : प्रतिनिधी
Corruption of Recruitment : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हजार पदांची मेगा भरती करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केलेले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यासाठी TCS आणि IBPS या दोन एजन्सीची निवड करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक नोकर भरती चा पेपर फोडण्यात येत असून याद्वारे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
Corruption of Recruitment मुंबई पोलीस भरती पेपर फुटी प्रकरण 2023
यामध्ये मुंबई पोलीस भरतीत 8 हजार पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षेत घोटाळा होऊ शकतो, याची कल्पना आम्ही परीक्षापूर्वीच मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र तरीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने मुंबई पोलीस भरती चा पेपर फोडला (Corruption of Recruitment). परिणामी आमच्या संघटनेच्यावतीने मुंबई पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दहिसर पोलीस स्टेशन मध्ये पेपर फुटीचा FIR दाखल करण्यात आला आहे. त्याचा सखोल तपास सुरू केला आणि शंभरहून अधिक आरोपी विरूध्द पुरावे सिद्ध केले आहेत. तरीही उमेदवारांना मेडिकल नंतर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घोटाळाबाज हायटेक कॉपी करताना इतरांची सिम कार्ड वापरले असल्यास अशा आरोपींना पकडणे कठीण झाले आहे. १००% गुन्हेगारी पकडण्यात आले आहे का ? याचे उत्तर मुंबई पोलिसांनी द्यावे, जर १००% पारदर्शक भरती झाली नसेल तर नियुक्त्या देण्याची इतकी घाई का ? सखोल तपास पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती देण्यात यावीत, अशी आमची मागणी आहे.
Corruption of Recruitment वनविभाग पेपर फुटी प्रकरण 2023
वन विभागाच्या 2 हजार 318 पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. वन विभाग परीक्षेत काहीजण गैरप्रकार करू शकतात, याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला मिळाली होती. त्यानुसार आम्ही संभाजीनगर पोलीसांना याबाबत सूचित केले होते. परीक्षेच्या दिवशी संभाजीनगर पोलिसांनी टाकलेला धाडीत काही आरोपी पेपर फोडताना (Corruption of Recruitment) आढळून आले. आरोपीकडे प्रश्नांवलींचे 111 फोटो सापडले असून परीक्षा दरम्यान पेपर फुटल्याचे सिद्ध झाले आहे. वन विभागाच्या परीक्षेत अनेक FIR दाखल झाले आहेत. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे. Corruption of Recruitment
Corruption of Recruitment तलाठी भरती पेपर फुटी प्रकरण 2023
4 हजार 644 पदासाठी 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान एकूण 57 शिफ्ट मध्ये TCS-ION कंपनी मार्फत पेपर घेण्यात आले होते. तलाठी परीक्षेसाठी 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवार परीक्षेत हजर होते. तलाठी परीक्षेत अनेक गैरप्रकार झाले आहेत. नाशिक पेपर फुटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस भरती 2019, म्हाडा पदभरती 2023 मधील आरोपी गणेश गोसिंगे यांनी तलाठी भरती चा पेपर पहिल्याच दिवशी फोडला. आरोपीकडे प्रश्नपत्रिकांचे 186 फोटो आढळून आल्याचे FIR मध्ये नमूद आहे. स्पाय कॅमेरा, मायक्रो ब्लूटूथ सारखी अत्याधुनिक उपकरणे वापरून हा पेपर पुण्यात आला. अहमदनगर येथे उमेदवार परीक्षा दरम्यान पुस्तकात कॉपी करून पेपर सोडवताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पुस्तक परीक्षा केंद्राच्या आत नेले. यामुळे परीक्षा केंद्राची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कुचकामी असल्याचे निदर्शनास आले. वर्धा तनिया कॉम्प्युटर लॅब येथील परीक्षा केंद्रातील कर्मचारी परीक्षेच्या दरम्यान लॅपटॉप बराच वेळ केंद्रावर घेऊन गेला आणि नंतर परत केंद्राच्या आत आला. त्याने कोणाला प्रश्न पुरवले नसतील किंवा इतर गैरप्रकार केले नसतील का? केंद्रात आल्यानंतर ड्राईव्ह डाउनलोड करण्यात केली होती, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे परीक्षा पारदर्शकतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती, सांगली या ठिकाणी सुद्धा अनेक घोटाळ बाजावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा पध्दतीने पेपर फोडण्यातून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्ट्राचार केला जात आहे. मात्र यातील दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ने सरकारला दिला आहे.
अन्यथा सरकार विरोधात आंदोलन : प्रशांत शिरगुर
“पेपर फुटी घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येक विभागाला आम्ही मागण्यांचे निवेदन दिले आहे. परंतु कोणत्याही विभागाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका का दाखल केली आहे. महाराष्ट्र शासनाने व राज्य सरकारने परीक्षा पारदर्शकपणे घ्यावी आणि लाखो होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा सुरळीत व पारदर्शक घ्यावी. अन्यथा परीक्षा पद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होईल आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या विरोधात संघटना आंदोलन करेल.
-प्रशांत शिरगुर, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
हे ही वाचा
Crime News | पती-पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या
अखेर Jio AirFiber लाँच; 599 रुपयांत मिळणार ‘या’ शहरांना हायस्पीड इंटरनेट सेवा