China vs India and Nepal | नेपाळचे पुष्प कमल दहल सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी देशाच्या विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्या आहेत.
चीनच्या राष्ट्रपतींनी नेपाळ चीनशी जोडण्यासाठी, पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुविधेसाठी मदतीचा पर्याय दिला आहे. नेपाळ आणि तिबेट यामध्ये जलद संपर्क साधण्यासाठी रेल्वे नेटवर्क विकसित करावे, याविषयी चर्चा झाली आहे. China vs India and Nepal
नेपाळची सर्वाधिक आयात भारतात होते. नेपाळ आपले अस्तित्व टिकवून आहे. चीनला नेपाळचे हे भारतीय अवलंबित्व कमी करावयाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नेपाळला अनेक पायाभूत सुविधांच्या व विकासाच्या ऑफर दिल्या जात आहेत.
या भेटीबद्दल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, आपल्या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध मजबूत केले पाहिजेत. समस्येवेळी एकमेकांना मदत केली पाहिजे. तर नेपाळचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, चीन हा चांगला मित्र आहे. शी जिनपिंग एक दूरदर्शक नेता आहेत. China vs India and Nepal
हे ही वाचा