Chandrayaan-3 landing|इस्रोने मंगळवारी चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केले. Chandrayaan-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश आहे. यावेळी सर्व भारतीयांनी अभिनंदन इस्रो. अभिनंदन त्या सर्व शास्त्रज्ञाचे ज्यांनी अनेक वर्षे या क्षणासाठी कष्ट घेतले, अशा शब्दात सर्वांचे अभिनंदन केले.
ISRO ने Chandrayaan-3 चे यशस्वी लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, चंद्रावर उतरुन भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. अखंड भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. चांद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकामधून व्हर्चुअल माध्यमातून पाहिले. ‘चांद्रयान-3’ची मोहिम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा देशासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे.
Chandrayaan-3 landing
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”जीवन धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा अभूतपूर्व क्षण आहे. आज भारतामधील प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-३ च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो”. शास्त्रांच्या अथक परिश्रमामुळेच आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचण्यात यशस्वी झालोय. असा पराक्रम करणारा भारत पहिलाच देश आहे. आपण जमिनीला आई, आणि चंद्राला मामा म्हणतो. चांदो मामा खूप दूर आहे, असे म्हटले जात होते. पण आता असाही दिवस येईल, चांदो मामा फक्त एक पाऊल दूर आहे, असे मुलं म्हणतील.
भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची ही बाब आहे. भारतातील १४० कोटी जनतेची मान आज अभिमानाने उंचावली गेलीय आहे. ऊर आनंदाने भरून आला आहे. आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत आहे.
भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली. श्वास रोखले गेले. हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले. आणि सरते शेवटी चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली. Chandrayaan-3 चे यशस्वी लँडिंग झाले.
भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.