प्रतिनिधी : सोलापूर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव सादर केला. चुकीच्या पध्दतीने ठराव करून घेतला. परिणामी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनीही अधिकार नसताना जि. प. आरोग्य विभागात कनिष्ठ लिपीक मुजावर यांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता दिली आहे. दुसरीकडे या गैरप्रकारामुळे मुजावर यांचा प्रस्ताव सादर करणारे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपीक मुजावर यांना उपसंचालकांचे अधिकार मान्य नाहीत असे दिसून येत आहे.
जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांची आस्थापना राज्यशासनाची आहे. त्यांचे नियुक्ती अधिकारी हे उपसंचालक, पुणे मंडळ, पुणे हे आहेत. त्यामुळे शासनाच्या नियम-अटींप्रमाणे कनिष्ठ लिपीक मुजावर यांना प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकारही उपसंचालक, पुणे यांनाच आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीचा विनंती अर्ज मुजावर यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत उपसंचालक, पुणे यांना सादर करणे आवश्यक होते. परंतु संबंधीत सर्वांनी नियम-अटी डावलून चुकीच्या पध्दतीने ठराव करून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्याकडून प्रतिनियुक्ती करून घेतली. यामध्ये कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सीईओ कुलदिप जंगम यांचीही दिशाभुल केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, कनिष्ठ लिपीक मुजावर यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी प्रतिक्रीया दिली नाही.
हे ही वाचा अखेर डॉ. राधाकिशन पवारांकडील उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडे
उपसंचालकांनी सेवासमाप्तीचे आदेश दिल्याने चुकीच्या पध्दतीने प्रतिनियुक्ती…
जिल्हा क्षयरोग केंद्रातील कनिष्ठ लिपिक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांची 2008 साली सरळसेवा भरतीमार्फत नेमणुक झाली. (या भरतीप्रक्रीयेत गैरप्रकार झाला असून या प्रकरणात 96 जणांवर आरोप आहेत.) या भरती प्रक्रीयेत उत्तरपत्रिकेतील चुकीचे उत्तर बरोबर दर्शवुन गुणदान, एकुण प्राप्त गुणांमध्ये तफावत, लिखाणात फरक आदी कारणांमुळे तत्कालीन उपसंचालक डॉ. राधाकीशन पवार यांनी मुजावर आणि इतरांना सेवासमाप्तीचे आदेश दिले आहेत. त्याबाबत सध्या न्यायालयात केस सुरू आहे. त्यामुळे मुजावर यांच्या सेवासमाप्तीचे आदेश देणाऱ्या उपसंचालकांनाच प्रतिनियुक्तीचे अधिकार असणे, त्यांच्याकडूनच प्रतिनियुक्ती आदेश मिळवणे कठीण होते. त्यामुळे मुजावर यांची प्रतिनियुक्ती चुकीच्या मार्गाने, नियम-अटी डावलून, अधिकार नसताना करण्यात आली आहे. परंतु सध्या हे प्रकरण उजेडात आले असुन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडून प्रतिनियुक्ती रद्द केली जाणार की, उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार ? याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
उपसंचालक आणि सीईओंकडून “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”मधील नविन परवाने आणि नुतणीकरणाची चौकशी करून कारवाई करावी…
जि. प. आरोग्य विभागात मुजावर यांची प्रतिनियुक्ती केल्यानंतर त्यांच्याकडे “बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट”चा टेबल देण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून फेब्रुवारी 2025 पासुन याअंतर्गत नविन परवाने आणि नुतणीकरण बाबत आलेल्या प्रत्येक फाईलची चौकशी केल्यास आणखी “आर्थिक” सत्य बाहेर येणार आहे. अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टर चौकशीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर आणि सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडून सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी.
हे ही वाचा सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा, पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
अखेर डॉ. राधाकिशन पवार, डॉ. बबिता कमलापुरकर यांची महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी