मुंबई : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा औषध भांडारचे मुख्य औषध निर्माण अधिकारी प्रवीण सोळंकी यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते ‘”बेस्ट फार्मासिस्ट” पुरस्काराने गौरवण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्कृष्ठ कार्य, कोरोना काळात अविरत वैद्यकीय सेवेसाठी दिलेले योगदान आणि अविरत सामाजिक कार्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. या प्राप्त झालेल्या मानाच्या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही प्रविण सोळंकी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नवराष्ट्र न्यूज ग्रुपतर्फे मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित समारंभात प्रवीण सोळंकी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे तंत्रशिक्षण मंत्री आशिष पटेल, मेगास संस्थेच्या संस्थापक सीमा सिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रवीण सोळंकी यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. मोडनिंब, कोंडी व औराद येथील आरोग्य केंद्राच्या मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट म्हणून त्यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्यालयाच्या स्टोअरची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कोरोना महामारी, पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या काळात त्यांनी चांगली सेवा बजावली आहे. याची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते प्रविण सोळंकी यांना “बेस्ट फार्मसीस्ट” पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभागातून त्यांचे कौतुक होत आहे.
आरोग्य मंत्री “ॲक्शन मोड”वर; अधिवेशनात तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने कारवाईचे दिले आदेश