सोलापूर : प्रतिनिधी
शासकीय पदांचे कंत्राटीकरण, शासकीय शाळा दत्तक योजना, संभाजी नगर आणि नांदेड येथील औषध व आवश्यक आरोग्य सुविधां अभावी रुग्णांचे झालेले मृत्युकांड, पत्रकार व विचारवंतांवरील भ्याड हल्ले, गोदूताई नगर येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, जड वाहतूक आदीं विविध प्रश्न व मागण्यांसदर्भात सोलापूरात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे ही वाचा 5 तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जिल्हा परिषद, पूनम गेट येथे गुरूवारी (12 ऑक्टोबर 2023) युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारी नौकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळा दत्तक योजना रद्द कराव्यात्, आरोग्य सुविधा अभावी दगावलेल्या निष्पाप मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करावी, गोदूताई परुळेकर नगर येथील जडवाहतुक आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आदीं मागण्या घेऊन राज्य सरकारच्या विरोधात शासन निर्णयाची होळी व निषेध धरणे आंदोलन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, यावेळी पोलिसांनी मध्यस्ती केल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी युवा व जनता विरोधी शासन निर्णयाची आज फक्त होळी केली आहे. यापुढील आंदोलन आणखी तीव्र असेल अशा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव ॲड. अनिल वासम यांनी दिला.
त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक बल्ला, रफिक काझी, बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ, नरेश गुल्लापल्ली, सन्नी कोंडा, दिनेश बडगु, राहुल बुगले, राकेश म्हेत्रे आदीसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा Maharashtra Health Department Vision 2035 | आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे