Amit Shah Visit Lalbaugcha Raja | आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुंबईत येऊन लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. ते लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले.
गेल्या वर्षी ही Amit Shah यांनी कुटुंबीयांसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर यंदाही त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आज दुपारी मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर, ते आणि त्यांचे कुटुंबीय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी गेले. दर्शनानंतर Amit Shah हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पाहुणचार घेतला. तिथेही त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शहा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपमधील महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतील. Amit Shah Visit Lalbaugcha Raja
गेल्या वर्षी Amit Shah दोन दिवसांसाठी मुंबईत आले होते. यावेळीही ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या सुरक्षेबाबत गडबड असल्याचे निदर्शनास आले. Amit Shah यांच्या जवळून एक अनोळखी व्यक्ती फिरत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, आंध्र प्रदेशातील एका राजकारण्याचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून या अनोळखी व्यक्तीने सुरक्षा रक्षकांची फसवणूक केली. काही काळ ते Amit Shah यांच्या जवळ राहिले. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला संशय आल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी परिस्थिती पाहून अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतले होते. Amit Shah Visit Lalbaugcha Raja
गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भक्त दर्शनाला येतात. पहिल्याच दिवशी 2 लाखाहून अधिक भक्त दर्शनासाठी आल्याचा अंदाज आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता शाहरुख खान यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
लालबागच्या राजाला गणेशपूजेसाठी येणाऱ्या लोकांकडून दान स्वरूपात भरपूर पैसे आणि दागिने मिळतात. पहिल्या दिवशी 42 लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने दान पेटील आढळून आले. गेल्या तीन दिवसांत अनेक भक्तांकडून 1 कोटी 59 लाख 12 हजार रुपये दान करण्यात आले. Amit Shah Visit Lalbaugcha Raja