विशेष प्रतिनिधी : रणजित वाघमारे
आरोग्य विभागातील एका टक्केवारी प्रिय अधिकाऱ्याची गोष्ट. यांच्या टेबलवर एकही फाईल पेंडींग दिसणार नाही. मात्र एखाद्या सप्लायरने या अधिकाऱ्याची भेट न घेता टक्केवारीची चर्चा न केल्यास त्याच अधिकाऱ्याच्या टेबलाखाली तीच फाईल महिनाच काय दोन महिनेही पेंडींगच. अशाच एका पेंडींग फाईलची गोष्ट, खासदारांच्या 80 लाख रूपयांच्या निधीतून बसवण्यात येणाऱ्या “Air Source Water Heater” प्रकरणात समोर आली आहे.
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण
घडलेली घटना अशी की, स्वामीभक्त खासदारांच्या 80 लाख रूपये निधीतून 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात Air Source Water Heater बसवण्यात येणार होते. खासदार महाशयांनी सप्लायरच्या नावासहीत पत्र आरोग्यातील अधिकाऱ्याला पाठवलेले. खासदारांचे दिल्लीतील पीए वानखेडेंनी याचा पाठपुरवा सुरू ठेवलेला. परंतु खुद्द सप्लायरच आरोग्यातील अधिकाऱ्याची भेट घेण्यास विसरला. साहजिकच खासदारांचा निधी त्यामुळे यांना कशाला भेटायचे ? असा त्याचा गैरसमज. परंतु ऑर्डरच निघेना. त्यामुळे त्याचा गैरसमज जवळपास दिड महिन्यानंतर दूर झाला. कारण वानखेडेंनी आरोग्यातील अधिकाऱ्याला वारंवार कॉल केले. सप्लायर हा खासदार साहेबांचा माणूस असल्याचेही सांगितले. तरीही ऑर्डर निघाली नाही. त्यानंतर वानखेडेंनी मोर्चा सीईओ आणि कॅफो यांच्याकडे वळवला आणि त्यांनाही सदरची घटना सांगितली. मात्र तरीही ऑर्डर निघालीच नाही. अखेर आरोग्यातील अधिकाऱ्याने M/s. Ayyan Green Infra LLP च्या सप्लायरला बोलावून घेतले. सप्लायरही नाईलाजास्तव नाशिकवरून भेटायला आला. त्यानंतर सप्लायरच्या सर्व होकारानंतर संबंधित अधिकाऱ्याने दाढी खाजवली आणि फाईल लगेच पुढे सरकवली.
हे ही वाचा निसर्गापासून दूर न जाता निसर्गास आत्मसात करा : सीईओ मनिषा आव्हाळे
निधी खासदारांचा असला तरीही या आरोग्यातील अधिकाऱ्याचा टक्केवारीसाठी अट्टाहास. मग खुद्द आरोग्य विभागातील औषध खरेदी, आईसी, सर्जीकल खरेदी, बांधकाम आदी सर्वांसाठी आलेला जिल्हा परिषद सेस फंड, 15वा वित्त आयोग, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि डीपीडीसीतील निधीच्या बाबतीत काय प्रकार घडला नसेल ? अशी चर्चा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात रंगली आहे.
सीईओ, कॅफो ला नाही किंमत
वानखेडेंनी आरोग्यातील अधिकारी ऐकत नसल्याचे लक्षात येताच सीईओ आणि कॅफोंना विनंती केली. मात्र तरीही ऑर्डर निघाली नाही. त्यामुळे आरोग्यातील या अधिकाऱ्याकडून सीईओ आणि कॅफोंना जराही किंमत नसल्याची चर्चा नियोजन भवन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात रंगली आहे. तर दुसरीकडे हाच आरोग्यातील अधिकारी सीइओ आणि कॅफोंना मी स्वत: मलिदा पोहच करतो. त्यामुळे ते मला काहीही सांगू शकत नाहीत आणि सांगितले तरी मी त्यांचे ऐकनार नसल्याचे आरोग्य विभागात चर्चा करत आहे.
हे ही वाचा काकडे प्रकरणाचा वस्तुनिष्ठ खुलासा उपसंचालक कार्यालयास सादर करा
अर्हता नसताना महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी सातारकरांकडून प्रयत्न