सोलापूर : प्रतिनिधी
श्री. शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ संचलित श्री. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारास प्रशासक मनिषा फुलेंचा वरदहस्त आहे, अशी लेखी तक्रार इतर मागास बहुजन कल्याणचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडे संचालक रामभाऊ दुधाळ आणि ताजुद्दीन शेख यांनी गुरूवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे.
या लेखी तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी म्हटले आहे की, श्री. शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ संचलित परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळांच्या मान्यता मा. संचालक, विजाभज पुणे दि. 27.05.2008 अन्वये शैक्षणिक वर्ष 2007-08 मध्ये संपल्यानंतर रद्द केलेली आहे. त्यानंतर प्राथमिक आश्रमशाळेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तसेच सन 2023-24 पासून शासन आदेशाने माध्यमिक आश्रम शाळा कामती ही आश्रमशाळा देखील प्रशासक नियुक्ती करून चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर आश्रमशाळेवर प्रशासक म्हणून मनिषा फुले यांची सन 2023-24 पासून नेमणूक करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवारांकडून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय
सदरील प्राथमिक आश्रमशाळेवर कार्यरत असलेले मुख्याध्यापक अ. जब्बार साहेबलाल शेख यांच्याविरोधात बनावट तुकडी वाढ प्रकरणी मोहोळ कोर्टात याचिका चालु आहे. सह शिक्षक व इतर कर्मचारी यांचे बनावट वैयक्तिक मान्यताबाबत चौकशी चालू आहे. तरीही जब्बार शेख हे प्राथमिक आणि माध्यामिक आश्रम शाळेच्या शिक्षक हजेरी पत्रकावर संस्थेचे अध्यक्ष असल्याप्रमाणे आर्थिक घोडे बाजार करून नव-नविन सह-शिक्षक व इतर कर्मचारी यांची भरती करून रोजच्या रोज त्यांच्या शिक्षक हजेरी पत्रकावर सह्या घेत आहे. हा सर्व प्रकार प्रशासक मनिषा फुले यांना माहित आहे. या सर्व प्रकारात मुख्याध्यापक अ. जब्बार साहेबलाल शेख व प्रशासक मनिषा फुले यांचे आर्थिक लागेबांधे आहेत, असे आरोप संचालक तक्रारदारांनी तक्रारीत केले आहेत.
हे ही वाचा श्री. परमेश्वर आश्रमशाळेतील बेकायदेशीर ठरवलेल्या 16 शिक्षकांना वरदहस्त कोणाचा ?
तसेच रामभाऊ दुधाळ आणि संचालक ताजुद्दीन शेख यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांचे पत्र जा. क्र/ससंइमावक/आशा/कामती/इमारत/2024-25/2109 दि.03/08/2024 रोजीच्या पत्रामध्ये प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेसाठी श्री. शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ, कामती. ता. मोहोळ, जि. सोलापूर या संस्थेने बांधलेल्या इमारतीची तोडफोड करण्यास/इमारतीच्या मूळ ढाच्यामध्ये कोणतेही बदल करण्यास मनाई करण्यास आली असताना सुध्दा इमारतीची तोडफोड करण्यात आलेली आहे. याकडे प्रशासक म्हणून मनिषा फुले यांचे दुर्लक्ष आहे. या कृतीस वैयक्तिकरित्या प्रशासक म्हणून मनिषा फुले जबाबदार आहेत.
हे ही वाचा पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप
प्राथमिक आश्रम शाळा कामतीचे मुख्याध्यापक अ. जब्बार साहेबलाल शेख व मनिषा फुले यांनी जब्बार शेख यांची मुलगी जस्मीन अ. जब्बार शेख महिला अधिक्षिका व जब्बार शेख यांचा मुलगा मुश्रीफ अ. जब्बार शेख यांची सह-शिक्षक म्हणून माध्यमिक आश्रम शाळेवर पदाचा गैरवापर करून वैयक्तिक फायद्यापोटी गैरमार्गाने नेमणूक केलेली आहे. त्याच बरोबर श्रीमती अश्विनी आप्पाराव हविले सह-शिक्षक, दिशार रसूल शेख लिपीक, किसन भोसले प्रयोग शाळा परिचय, चैतन्य तानाजी राठोड शिपाई, अभिजित संजय पवार शिपाई वरील प्रमाणे अजुन ही काही व्यक्ती आहेत. ज्याच्या कडुन कामाला लावतो म्हणून अर्थिक व्यवहार करून शिक्षक हजेरी पत्रकावर नावे लिहुण सह्या सुरू केलेल्या आहेत.
हे ही वाचा परमेश्वर आश्रम शाळेवरील प्रशासक आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करा
प्राथमिक आश्रम शाळा कामतीचे मुख्याध्यापक अ. जब्बार साहेबलाल शेख यांची मुलगी जस्मीन अ. जब्बार शेख महिला अधिक्षिका म्हणून मान्यता घेताना संस्थेचे खोटे कागदपत्रे तयार करून शाळेवर प्रशासक असताना संस्थेच्या नावे प्रस्ताव दाखल करून महिला अधिक्षिकांची वैयक्तिक मान्यता घेऊन शासनाची दिशाभूल केली आहे. वरील इतर जनांची सुध्दा अशीच शासनाची दिशाभूल करून वैयक्तिक मान्यता घेतलेली आहे. या सर्व गोष्टींची कल्पना मनिषा फुले यांना आहे. प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यापासून मनिषा फुले यांनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेस एकदा ही भेट दिलेली नाही. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कामती येथे प्रशासक म्हणून मनिषा फुले यांनी अ. जब्बार साहेबलाल शेख यांची प्रतिनियुक्ती केली आहे का ? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
हे ही वाचा आरक्षण धोरणाची पायमल्ली करणाऱ्या डॉ. राधाकिशन पवार यांची चौकशी करून कारवाई करा
श्री परमेश्वर प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कधीही शाळेवर हजर नसतात. ते चौविसतास सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर, येथेच असतात. सध्या पटावर असणारे मुले-मुली ही बनावट असून दोन-दोन, तीन-तीन वेळा त्यांची नावे घेतली आहेत. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार प्रशासक व मुख्याध्यापक मिळून करत आहेत.
हे ही वाचा उप सचिव अनिरूध्द जेवळीकरांच्या विरोधात 15 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू
श्री परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कामती खुर्द मधील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर न येता फक्त शिक्षक हजेरी पत्रकावर सह्या करुन पगारी घेतात. त्या मोबदल्यात प्रशासक व मुख्याध्यापकांना टक्केवारी दिले जाते. त्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-याच्या जागेवर दुसराव्यक्ती प्रतिनियुक्त करुन त्यांना मानधन तत्वावर नेमणुक केली करून मानधन दिले जाते. तरी वरील सर्व गोष्टीकडे प्रशासक म्हणून मनिषा फुले या कारणीभुत आहेत. तरी संचालकांनी सदर शाळेस अचानक भेट देऊन शाळेची कसुन चौकशी करावी, सर्व बाबी तपासून दोषीवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी लेखी तक्रारीव्दारे संचालक रामभाऊ कुंडलिक दुधाळ आणि संचालक ताजुद्दीन शेख यांनी केली आहे.
हे ही वाचा रूग्णसेवा टाळण्यासाठी डॉ. सुहास मानेंचा नवा फतवा; ओळखपत्र असेल तरच मिळणार केसपेपर आणि उपचार