सोलापूर : प्रतिनिधी
ACB TRAP : येथील झिरो पोलिसासह एका हवालदारावर मुतारीत खेळण्यातील नोटा स्विकारल्या, परिणामी त्यांच्यावर अँटीकरप्नशनची कारवाई झाली असून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेली घटना अशी की, तक्रारदार यांच्यासह कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांवर MIDC पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कलम न वाढवणे, अटक करून टेबल जामीन देणे व न्यायालयात पोलीस कोठडी न मागण्यासाठी 30 हजार रूपये लाचेची मागणी मध्यस्थामार्फत करण्यात आली होती. याबाबतचा तपास आरोपी लोकसेवक हवालदार प्रमोद कांबळे यांच्याकडे दिला होता. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रमोद कांबळे यांनी सुरवातीला 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यामध्ये तक्रारदार यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांना कलम ३२६ न वाढवता या गुन्ह्यात अटक केल्यानंतर टेबल जामीन देणे आणि पोलीस कोठडी न मागण्याच्या अटीवर ही लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार रूपये देण्याचे ठरले. पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये झिरो पोलीस नागा उर्फ नागनाथ काळूराम अलकुंटे याच्याकडे देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे झिरो पोलीस नागा हा पोलीस ठाण्याच्या मुतारीत थांबला होता. नागा अलकुंटे याने मुतारीत तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले. 10 हजार रुपये दिल्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना इशारा केला. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रॅप लावताना 5 हजार रुपये किंमतीच्या खऱ्या नोटा व 5 हजार रूपयांच्या मुलांच्या खेळण्यातील नोटा तक्रारदाराकडे दिल्या होत्या. त्या नोटा झिरो पोलीस अलकुंटेमार्फत स्वीकारताना पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी या दोन्ही आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याने आरोपींना बेड्या घालायला हव्या होत्या. परंतु त्याच तपास अधिकाऱ्याला बेड्या पडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
हे ही वाचा कोयत्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
चोरट्यांनीही साजरी केली दिवाळी