सोलापूर : प्रतिनिधी
विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासह २६ जणांविरोधात एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.
माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी सिध्देश्वर नगर, नई जिंदगी सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून, कोणतीही पूर्वपरवानगी न देता आंदोलन केले आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह नुरूद्दीन मुल्ला, अबुबकर हारूण सय्यद, रफिक इनामदार, अब्दुल करीम शेख, असिफभाई राजे यांच्यासह अन्य 15 ते 20 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस नाईक कृष्णात धोंडीबा कोळी यांनी फिर्याद दिली आहे. तौफिक शेख यांनी नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आजपर्यंत विविध आंदोलन केली आहेत. सदर घटनेचा तपास सहाय्यक पेालिस निरीक्षक साळुंखे हे करत आहेत.
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 22 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 22 ऑक्टोबर 2023