सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला अखेर 500 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा भारताचं असं स्वप्न पाहिलं होतं. जिथे शिक्षणाचा प्रकाश त्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल, ज्याला समाजाने काठावर ढकलून दिलं होतं. त्या महान ध्येयासाठीच 8 जुलै 1945 साली ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ची स्थापना करण्यात आली. ही संस्था “अशिक्षेचा अंधार दूर करून ज्ञानाचा दीप प्रत्येक घरात पेटवणारी” बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत आहे.
हे ही वाचा राज्यात “Women In Leadership Roles”मध्ये…
काळ सरला, पण काही इमारतींवर काळाचे डाग बसले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या भिंतींना तडे गेले, बाकं मोडकळीस आली आणि त्या जागांमध्ये बाबासाहेबांचं स्वप्न धुळीत माखल्यासारखं भासत होतं. जुन्या इमारतींचा ओलसर वास आणि धुळीच्या पुस्तकांमधून ती शिक्षणक्रांती मंदावल्यासारखी वाटू लागली, जी एकेकाळी समाजाला नवजीवन देत होती.
परंतु आज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त इमारती दुरुस्त करण्यासाठी नाही, तर बाबासाहेबांच्या अपूर्ण स्वप्नाला पुन्हा प्राणवायू देण्यासाठी आहे. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील PES अंतर्गत असलेल्या महाविद्यालये, शाळा आणि वसतिगृहांच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही फक्त आर्थिक मदत नाही, ही बाबासाहेबांच्या विचारांना, त्यांच्या शिक्षणक्रांतीला आणि सामाजिक न्यायाच्या आंदोलनाला नवसंजीवनी आहे ! यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले आहेत याच विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांनी. तसेच या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनीही ठोस निर्णय घेतले.
हे ही वाचा पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सक्षम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
परंतु या योजनेसाठी खरे प्रयत्न केले ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी. एक असा अधिकारी, ज्यांनी बाबासाहेबांचा वारसा फक्त जपला नाही, तर त्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांचं हे कार्य फक्त एक प्रकल्प नाही, हे एक पवित्र मिशन आहे! शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय साध्य करण्याचं मिशन, जे स्वतः बाबासाहेबांनी सुरू केलं होतं. ज्या काळात दलित, शोषित आणि वंचित समाजातील मुलांसाठी शाळेच्या दारात उभं राहणंही स्वप्न होतं, त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या – PES ची पायाभरणी केली.
सिद्धार्थ कॉलेज (मुंबई), मिलिंद कॉलेज (छत्रपती संभाजीनगर), नाईट कॉलेजेस आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे या केवळ इमारती नव्हत्या, तर सामाजिक क्रांतीच्या प्रयोगशाळा होत्या. या संस्थांमधून लाखो विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, न्यायाधीश, अधिकारी बनले. ज्यांनी जात, धर्म आणि वर्गाच्या सीमारेषा ओलांडून समाजाच्या प्रत्येक थरात शिक्षणाचा दीप पेटवला. तसेच डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासारखे अधिकारी सिद्ध करतात की, बाबासाहेबांचं स्वप्न आजही जिवंत आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर त्या भारताची कहाणी आहे, जो बाबासाहेबांनी पाहिला होता. एक असा भारत, जिथे प्रत्येकाला आपला हक्क मिळेल, प्रत्येकाचा आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येकाचं मस्तक उंच राहील. आणि डॉ. कांबळे जिथे जातात, तिथे परिवर्तनाचा ठसा उमटवतात. उद्योग विभागात असताना त्यांनी विक्रमी परकीय गुंतवणूक आणली, नवे रोजगार निर्माण केले आणि प्रशासनात लोककल्याणाचा नवा अध्याय लिहिला. ते स्वतः बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित आहेत आणि त्यांनाच आपला आदर्श मानतात. बाबासाहेब म्हणाले होते “आपल्या लोकांनी धोरणं बनवणाऱ्या जागी पोहोचून समाजासाठी कार्य केलं पाहिजे.” आणि डॉ. हर्षदीप कांबळे हे त्या विचारांचं प्रेरणादायी मूर्तिमंत उदाहरण आहेत.
हे ही वाचा डॉ. मनिषा विखे आणि डॉ. मिनाक्षी बनसोडे यांचे निलंबन




