भाग 4 : रणजित वाघमारे
सन 2009 मधील 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करणे, अस्थायी सेवेतील लाभ देणे, कॅबिनेट निर्णय घेणे आणि शासन निर्णय काढण्यासाठी यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 45 ते 50 कोटी रूपयांची वसुली केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ज्यामध्ये बीड चे भुमीपुत्र, मॅग्मोचे तत्कालीन अध्यक्ष, मॅग्मोचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि कात्रज कार्यालयातील एक पीए आदींचा समावेश आहे. यामध्ये स्वयंघोषीत वसुलदारांकडून आरोग्य मंत्र्यांचा विश्वास संपादन करून आणि आरोग्य मंत्र्यांच्या नावे लुट सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य मंत्र्यांपेक्षा जास्त बीडच्या भुमीपुत्राचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. ज्यामुळे खुद्द आरोग्य मंत्री अडचणीत येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या सन 2009 मधील 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रकरण “सत्ताकारण”च्या हाती लागले आहे. यामध्ये राज्यातील जवळपास 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी 400 लाखांची टोपी घालण्यात आली आहे. ज्यामध्ये जवळपास 45 ते 50 कोटींची वसुली करण्यात आली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या CM पदासाठी स्वयंघोषीत वसुलदारांकडून 2 कोटींचा “Sweet Message” परस्पर व्हायरल
यामध्ये राज्यातील 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांना फेब्रुवारी 2009 मध्ये विशेष शासन निर्णय (GR) काढून शासन सेवेत एकवेळचे समावेश म्हणून कायम केले गेले. परंतु त्यातील जाचक अटींमुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वी 10 ते 15 वर्षे केलेली सेवा समाविष्ट केली नाही. त्यामुळे साहजिकच त्यांची सेवाजेष्ठता विचारात घेतली गेली नाही. तसेच फायदेही दिले गेले नाहीत. अशाच प्रकारच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेशासाठीही जाचक अटी संबंधीत जीआर मध्ये होत्या. या प्रकारच्या जाचक अटीवरती शासनाने समावेशन केल्याने पूर्वीची सेवा ग्राह्य न धरल्याने असंख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या मुळे वेतनापासूनच सुरवात करावी लागली. आणि त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले. या जाचक अटी रद्द करून सेवेत कायम केले, त्या आधीचे सर्व लाभ मिळावेत म्हणून आर्थिक गणिते जुळवत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) या संघटनेच्या अध्यक्षांपासून ते बीडच्या भुमीपुत्रापर्यंत सर्वांनी वसुली केली. यासाठी पैसे दिलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक्सल सीट बनवण्यात आली. ज्यामध्ये सध्या कार्यरत जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याही नावांचा समावेश आहे.
हे ही वाचा स्वयंघोषीत वसुलदारांच्या विरोधात विरोधातील डॉक्टर संजय राऊत, रोहीत पवार आणि ACB च्या दारी
या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी कधी दिड लाख तर कधी चार लाख रूपये जमा करून घेतले गेले आहेत. ज्यांनी पैसे जमा केले आहेत, सध्या त्यांनाच तांत्रिक फंड अर्जित रजेत रूपांतरीत करत असल्याचे, वेतननिश्चीतीचे आदेश प्राप्त झाले आहेत. यामध्ये बीडचे भुमीपुत्र, मॅग्मो चे तत्कालीन अध्यक्ष, कात्रज कार्यालयातील एक पीए आदींचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या प्रकरणात वसुलीचे काम पाहणारे बीड चे भुमीपुत्र, मॅग्मोचे अध्यक्ष, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मॅग्मोचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होत आहे.
क्रमश: – (पुढील भागात रात्री 12 वाजता पुणे उपसंचालक कार्यालयातून पाठवण्यात आलेले प्रस्ताव, कऱ्हाड-पुणे-मुंबई मार्गे पैशांची देवाण घेवाण, वसुली पथक तसेच Google Sheets मध्ये पैसे जमा केलेल्यांची “Solapur District BBOP Documents List” आणि बरंच काही…)
हे ही वाचा आषाढी वारीत वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या : सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार
सोलापूर विभागात मनमानी कारभारातून एसटी महामंडळाची आर्थिक लूट