– शेगावात ‘श्रीं’चे दर्शन घेऊन सुरू केली यात्रा
बुलढाणा : प्रतिनिधी
Yalgar Yatra : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ शेतकऱ्यांची मूठ बांधण्यासाठी रविकांत तुपकरांची (Yalgar Yatra) एल्गार रथ यात्रेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. रविकांत तुपकरांनी शेगावातून श्री. संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून या एल्गार रथयात्रेला सुरुवात केली. यात्रेद्वारे सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे आणि पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, पिकविम्याची रक्कम मिळावी या व इतर अन्य मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा सुरक्षिततेच्या दृष्टीने बुलडाणा शहर 99 सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत
ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील असंख गावोगावी जावून बैठका, सभा घेऊन शेतकरी व तरुण शेतकऱ्यांची फौंज एकत्र करणार आहे. आज पहिल्या दिवशी खामगाव तालुक्यात ही यात्रा असणार आहे. दरम्यान 20 नोव्हेंबर रोजी एल्गार यात्रेचा समारोप बुलढाण्यात भव्य एल्गार महामोर्चात होणार आहे.
हे ही वाचा केंद्राकडून राज्यातील 15 शहरात PM E Bus Seva, जाणून घ्या कोण-कोणत्या शहरांचा आहे समावेश…
Wife’s Death | पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दारुड्या पतीस 5 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा