Vande Bharat Express Train | देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वेळेत व लवकर पोहचण्यासाठी आज 9 Vande Bharat Express Train चे लोकार्पण केले आहे. त्यामुळे भाविकांचा आणि नागरिकांचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे.
11 राज्यांमधून धावणार Vande Bharat Express Train
Vande Bharat Express Train आजपासून सुरू होत असून ती 11 राज्यांमधून धावेल. राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या गाड्यांची अधिकृत सुरुवात झाली आहे. या Vande Bharat Express Train मुळे पर्यटक आणि इतर प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होईल. ऐन गणेशोत्सवादरम्यान देशासाठी ही एक मोठी भेट असल्याचे मानले जात आहे. या गाड्या आधी सुरू केलेल्या गाड्यांपेक्षा थोड्या लहान असतील. 16 ऐवजी फक्त 8 डबे असतील. प्रवाशांना Vande Bharat Express Train आवडल्यास यामध्ये आणखी डबे जोडले जातील, असे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Vande Bharat Express Train मुळे प्रवास होणार जलद
सध्या, हैदराबादहून बंगलोरला जाण्यासाठी नियमित गाड्यांना साडेअकरा तास लागतात. परंतु राजधानी एक्स्प्रेसला १० तास लागतात. नवीन Vande Bharat Express Train ला गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी फक्त 8 तास लागतील. म्हणजे दोन शहरांदरम्यान प्रवास करताना लोकांचा बराच वेळ वाचणार आहे. हैदराबाद आणि बंगळुरू या दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना या दोन्ही शहरांमध्ये खूप जलद प्रवास करता येईल.
सध्या या शहरांदरम्यान तीन नियमित गाड्या आहेत. काचीगुडा-बंगलोर-म्हैसूर, काचीगुडा-यालहंका आणि निजामुद्दीन-बंगलोर राजधानी एक्सप्रेस. याशिवाय, गरीब रथ एक्स्प्रेस ट्रेन आहे, जी आठवड्यातून तीन दिवस धावते आणि काचीगुडा-यशवंतपूर, जबलपूर-यशवंतपूर आणि लखनौ-यशवंतपूर या ट्रेन्स दररोज धावतात. आता Vande Bharat Express Train धावायला सुरुवात करणार आहे. ही ट्रेन महबूबनगर येथून सुरू होईल आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून जाईल.
Vande Bharat Express Train च्या लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मुख्य अधिकारी उपस्थित होते. आज नव्याने सुरू केलेल्या 9 Vande Bharat Express Train उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील. यामुळे या राज्यातील धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळणार असून भाविक आणि प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे.