सोलापूर : प्रतिनिधी
श्री. परमेश्वर माध्यमिक आश्रमशाळा, कामती खुर्द ता. मोहोळ जि. सोलापूर येथे २०१३ पासून एकाच पदावर आणि एकाच वेतनश्रेणीवर दोन लोक वेतन घेत आहेत, अशी लेखी तक्रार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांकडे सुमन सुखदेव ऐवळे यांनी केली आहे.
हे ही वाचा आश्रमशाळेतील बेकायदेशीर नेमणुका ठरवलेल्या 16 शिक्षकांना वेतन सुरू
लेखी तक्रारीमध्ये तक्रारदार सुमन सुखदेव ऐवळे यांनी म्हटले आहे की, २०१३ पासून एकाच पदावर आणि एकाच वेतनश्रेणीवर दोन लोक वेतन घेत आहेत. कायद्याने म्हेत्री चंद्रकांत हे कोर्ट आदेशाने वेतन श्रेणीस पात्र आहेत. परंतू मदने जयप्रकाश विश्वनाथ सध्या कार्यरत कामती खुर्द हेही मुख्याध्यापक वेतनश्रीणीने वेतन घेत आहेत. वारंवार विनंती अर्ज, तक्रारी अर्ज दाखल करूनही त्यांची वेतनश्रेणी बदलली नाही. 2013 ते 2023 या दरम्यान शाळा बंद असतानाही या दोघांनी मुख्याध्यापक वेतनश्रेणीने वेतन घेतले आहे. शासन या गोष्टीकडे डोळेझाक का करत आहे ? हे समजू शकले नाही.
हे ही वाचा परमेश्वर आश्रम शाळेवरील प्रशासक आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करा
तरी 2013 पासून वेतनश्रेणी बेकायदेशीर घेऊन शासनाची फसवणुक केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. मदने यांचा कारभार वेळेत न येणे, कर्मचाऱ्यांना आरेरावीने बोलणे असे आहे. तरी लवकरात लवकर चौकशी होऊन बेकायदेशीरपणे घेत असलेली वेतनश्रेणी रद्द होऊन फसवणुक केलेली रक्कम वसुल करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार सुमन सुखदेव ऐवळे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांकडे केली आहे.
हे ही वाचा पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप
आरक्षण धोरणाची पायमल्ली करणाऱ्या डॉ. राधाकिशन पवार यांची चौकशी करून कारवाई करा