Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य 4 ऑक्टोबर 2023 (Today Horoscope 4 October 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…
मेष : आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला असेल
या राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन सुखी आहे. परंतु आपल्या पती/पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी जाणवेल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला असेल. आज विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होणार. आई-वडिलांच्या इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळा
—————————————————————
वृषभ : गुंतवणुकीची एक चांगली संधी आज प्राप्त होण्याची शक्यता
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज छोटेमोठे मतभेद टाळा. आजचा दिवस नोकरी-धंद्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असणार. गुंतवणुकीची एक चांगली संधी आज प्राप्त होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक- 4
शुभ रंग- करडा
—————————————————————
मिथुन : जोडीदाराच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
नोकरीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात किंवा नोकरीत वृद्धी दिसून येईल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस खूप चांगला आहे. उत्पन्नाची साधने वाढवण्याच्या संधी आज चालून येतील. मात्र धोकादायक गुंतवणुकीपासून सावधान रहावे. जोडीदाराच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक- 7
शुभ रंग- लाल
—————————————————————
कर्क : शांत राहून कामे पूर्ण करा
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज काही अडचणींना सामोरे जावे लागणार. मात्र त्यातून सकारात्मक निकाल हाती येणार. आज मानसिक संतुलन ठेवावे. शांत राहून कामे पूर्ण करा. कुटुंबियांमध्ये क्लेष निर्माण होण्याचे संकेत आहेत. आज शक्य असल्यास दूरचा प्रवास टाळू शकता.
शुभ अंक- 6
शुभ रंग- निळा
—————————————————————
सिंह : वरिष्ठाबरोबर वाद शक्यतो टाळावा
या राशीच्या लोकांनी आज आपले आरोग्य सांभाळावे. नोकरीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठाबरोबर वाद शक्यतो टाळावा. आज धार्मिक व आध्यात्मिक कार्य तुम्हाला सुख, शांती देईल. खिशावरील ताण वाढेल.
शुभ अंक- 2
शुभ रंग- हिरवा
—————————————————————
कन्या : व्यवसायात वाढ दिसून येणार
या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाद असेल. उत्पन्नाची साधने दुपटीने वाढतील. आप्तांचा व नातेवाईकांचा आधार आज लाभेल. अपत्य संबंधित ताण-तणाव होतील. व्यवसायात वाढ दिसून येणार. मात्र आज आरोग्याच्या समस्या जाणवणार, त्यामुळे आरोग्याच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक- 2
शुभ रंग- जांभळा
—————————————————————
तुळ : अनावश्यक खर्च टाळावा
या राशीसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज सुखी, समाधानी व निरोगी जीवनशैली राहील. परंतु जीभेवर ताबा ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. व्यवसायात वाढ दिसून येणार, मात्र गुंतवणूक विचारपूर्वकच करावी. नवीन संधी शोधाल.
शुभ अंक- 4
शुभ रंग- गुलाबी
—————————————————————
वृश्चिक : स्वास्थ्य विषयक काळज्या मिटतील
आज घरात संतुलित वातावरण ठेवणे योग्य राहिल. वादविवाद, अनावश्यक चर्चा टाळणे उत्तम. व्यावसायिक पातळीवर अडचणींना तोंड द्यावे लागेल. मात्र जिभेवर ताबा ठेवावा. स्वास्थ्य विषयक काळज्या मिटतील. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्यावा, फायद्याचा ठरेल.
शुभ अंक- 7
शुभ रंग- पांढरा
—————————————————————
धनु : व्यवसायात उधारी देणे बंद करा
आज यश प्राप्तीसाठी अधिक कष्ट करावे लागतील. अनावश्यक प्रवास टाळावा. व्यवसायात उधारी देणे बंद करा. मनात नकारात्मक भावना येऊ शकतात. त्यामुळे महत्वाचे निर्णय शक्यतो घेणे टाळा. जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या, तो फायद्याचा ठरू शकेल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पोपटी
—————————————————————
मकर : आज कर्ज घेणे टाळा
आज आर्थिक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे. आज कर्ज घेणे टाळा. गुंतवणूक करताना सर्व दृष्टीकोनातून विचार करूनच गुंतवणूक करा. कुटुंबीयांसोबत मतभेद होतील, मात्र गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न नक्की करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
—————————————————————
कुंभ : पथ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे
आजचा दिवस उत्तम राहील. मनातील ऊर्जा व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी वापरावी. आध्यात्मिक प्रवास घडू शकतो. पथ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नवीन काही सुरु करण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
शुभ अंक- 2
शुभ रंग- निळा
—————————————————————
मीन : कर्जांवरून होणारे वाद-विवाद टाळा
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला. काहीजण कारणाशिवाय तुमच्या विरुद्ध गेले तरी त्यावर वेळ आणि उर्जा खर्च करू नये. कर्जांवरून होणारे वाद-विवाद टाळा. मोठी गुंतवणूकही टाळलेली बरी. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी सायंकाळी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे.
Today Horoscope 4 October 2023
शुभ अंक- 5
शुभ रंग- पिवळा
हे ही वाचा