- महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडून कामाची पाहणी
सोलापूर : प्रतिनिधी
Aqueduct : सोलापूर- उजनी दुहेरी समांतर जलवाहिनीच्या काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मंगळवारी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत सदरच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाडचे रंगा राव, एम. जी. पी. चे एम. एस. हरीश, विजयकुमार नलावडे, अरुण पाटील, देविदास मादगुंडे आदी उपस्थित होते. Aqueduct
दुहेरी जलवाहिनीचे संपूर्ण काम नोव्हेंबर 2024 पर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सदर ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या पाईपची कोटिंग, पाईपची उंची, पाईपची लांबी, जॅकवेल, जॅकवलेचे चॅनल, दुबार पपिंग तसेच पाईपलाइन टाकताना ज्या ठिकाणी अडथळे आहेत, त्याची पाहणी आयुक्त तेली-उगले यांनी केली. Aqueduct
जॅकवेलच्या कामासाठीची 60 टक्के खोदाई पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर जलवाहिनी टाकण्यासाठी पाईपही पुरवठा केले जात आहेत. सदर योजने अंतर्गत सोलापूर शहरास दररोज 170 MLD पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्व धरण क्षेत्रात जाकवेल बांधने, पपिंग मशीनरी, रायझिंग मेन, बी. पी. टी, ग्राविटी मेन इत्यादी कामाचा समावेश करण्यात आले आहे. सदरचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. Aqueduct
हे ही वाचा Nagpur Crime News | मोबाईलवर बोलताना ७ व्या मजल्यावरून कोसळला थेट खाली
Sunny Deol Upcoming Movies | ‘गदर 2’च्या यशानंतर ‘या’ कारणामुळे सनी देओल ने साईन केले नाहीत चित्रपट