प्रतिनिधी : सोलापूर
येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांनी वरिष्ठांचे अधिकार स्वतः वापरून बेकायदेशीरपणे प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. वरिष्ठांच्या अधिकाराचा स्वतःसाठी गैरवापर केला आहे. याबाबत तक्रार देताच त्यांनी बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द करून नियमानुसार वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे सिध्द झाले असुन, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
तक्रारी अर्जात म्हटले आहे की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांनी तक्रार दाखल करताच गैरप्रकारे केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यानंतर नियमानुसार/रितसर वरिष्ठांकडे प्रतिनियुक्त्यांसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. त्यामुळे त्यांनी यापूर्वी चुकीच्या पध्दतीने प्रतिनियुक्त्या केल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
डॉ. संतोष नवले आणि मुजावर यांच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करा