सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
जि. प. आरोग्य विभाग, सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांची लेखी तक्रार पुणे उपसंचालक कार्यालयात 7 महिन्यापूर्वी दिली होती. त्यासाठीचे पुरावे देखील त्याचवेळेस सादर केले होते. परंतु 7 महिन्यानंतरही कोणतीच कारवाई केली नाही. डॉ. भगवान पवार हे पुरावे देऊनही न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवारांवरच कारवाई करा, अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि प्रधान सचिव निपुण विनायक यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा पुणे उपसंचालकपदी डॉ. राधाकिशन पवार यांची नेमणुक करा
तक्रारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी म्हटले आहे की, उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे जि. प. आरोग्य विभाग सोलापूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी उपसंचालकांच्या अधिकाराचा स्वतः गैरवापर केला आहे. अधिकार नसताना त्यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांना बेकायदेशीरपणे प्रतिनियुक्ती दिली होती. याबाबत मी पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे 7 महिन्यापूर्वी लेखी तक्रार दिली होती. परिणामी कनिष्ठ लिपीक लाडले मशाक अब्दुलगणी मुजावर यांची बेकायदेशीररित्या केलेली प्रतिनियुक्ती रद्द केली. जर प्रतिनियुक्ती नियमानुसार असती, तर ती रद्द केली नसती. त्यामुळे बेकायदेशीर प्रतिनियुक्ती, डॉ. संतोष नवले यांच्याकडून वरिष्ठांच्या अधिकाराचा स्वतः गैरवापर, कनिष्ठ लिपीक लाडले मशाक मुजावर कडून नियमबाह्य पध्दतीने नको तेथे प्रतिनियुक्तीसाठी विनंती अर्ज देणे, याबाबत सविस्तर लेखी तक्रार मी पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे दिली होती. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला. त्यांनी नावाला चौकशी समिती नेमली. परंतु अद्याप पर्यंत उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी न्याय दिला नाही. त्यांच्याकडून गेल्या 7 महिन्यात काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे जनतेला न्याय न देता, आरोग्य विभागातील चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, असक्षम अशा उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावरच कारवाई करावी, अशी लेखी तक्रार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि प्रधान सचिव निपुण विनायक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश मोरे यांनी केली आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. भगवान पवारांच्या निलंबनाचे संकेत
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसुन व्यापक लोकचळवळ बनावी : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू




