सोलापूर : प्रतिनिधी
उजनी कालवा विभाग क्र. 8, सोलापूर येथील कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर आणि या टेंडर प्रक्रीयेशी संबंधीत अधिकारी यांनी शासन निर्णय डावलून, बेकायदेशीर कामे केली आहेत. त्यासंबंधीची तक्रार जलसंपदा विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता (विप्र) डॉ. ह. तु. धुमाळ यांच्याकडे केली होती. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने स्मरणपत्र देण्यात आले. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु तरीही श्री. धुमाळ यांच्याकडून श्री. कोंडेकर यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे डी. जे. कोंडेकर यांना पाठीशी घालणाऱ्या जलसंपदा विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता (विप्र) डॉ. ह. तु. धुमाळ यांच्यावर कारवाई करा, अशी तक्रारी मागणी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दिपक कपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.
हे ही वाचा कार्यकारी अभियंता कोंडेकर यांच्याकडून शासन निर्णयास डावलून मनमानी पध्दतीने अनेक टेंडरचे वाटप
उजनी कालवा विभाग क्र. 8, सोलापूर येथील कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर आणि या टेंडर प्रक्रीयेशी संबंधीत अधिकारी यांनी “शिरापूर उपसा सिंचन योजने”ची कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यासाठी पात्र ठेकेदारांना अपात्र करणे, जलसंपदा विभागाचा दि. 18.10.2023 रोजीचा शासन निर्णय क्रमांक : निविदा 0417/(प्र.क्र.247/17)मोप्र-1 मधील अ. क्र. 16 नुसार त्यांनी कार्यवाही न करणे, सुर्यवंशी कन्स्ट्रक्शनने निविदेसाठी सादर केलेला कामाचा दाखला चुकीचा असल्याचे विभागीय कार्यालयाने अभिप्राय दिला आहे, संधानकांचे परिमाण हे चुकीचे असलेबाबत कळविले, Self Evalution मध्ये Conctete चे परिमाण दिलेले नाही, असे संबंधीत विभागाने कळवले असतानाही मर्जीतील ठेकेदाराला ठेका देणे, तसेच शिरापूर उपसा सिंचन योजना 8 कोटी 69 लाख 21 हजार रूपये या रकमेच्या कामाची निविदा जालिंदर विश्वनाथ लांडे या मक्तेदाराला दिली आहे. सदरच्या मक्तेदाराने या कामाच्या निविदेमध्ये सादर केलेली कामाची कागदपत्रे आणि सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी करावी, आदी सर्व कामातील अनियमितता, शासन निर्णयाला डावलून कामांचे वाटप, मर्जीतील ठेकेदारांना नियमबाह्य पध्दतीने कामांचे वाटप करणे आदी संदर्भात कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर, उजनी कालवा विभाग क्र. 8, सोलापूर यांच्याविरोधात आणि संबंधीत अधिकारी, कर्मचारी आणि मक्तेदार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात जलसंपदा विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता (विप्र) डॉ. ह. तु. धुमाळ यांच्याकडे 14 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रारी अर्ज दिला होता. मात्र यावर कोणतीही चौकशी आणि कारवाई झाली नाही. त्यानंतर मुख्य अभियंता डॉ. धुमाळ यांना 25 नोव्हेंबर 2024 रोजी “स्मरणपत्र” दिले. मात्र त्यालाही 6 महिने झाले तरीही मुख्य अभियंता डॉ. ह. तु. धुमाळ यांच्याकडून काहीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे गैरकारभार करणाऱ्या कोंडेकर यांना पाठीशी घालणाऱ्या धुमाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
श्री. धुमाळ आणि श्री. कोंडेकर यांच्या कार्यकाळातील सर्व वर्क ऑर्डर चौकशी व्हावी…
श्री. धुमाळ आणि श्री. कोंडेकर यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पध्दतीने ठेकेदारांना कामांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व ठेकेदारांना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे कामे दिली ? याची तपासणी व्हावी. तसेच कोंडेकर यांनी “विकास धोंडीबा कुंभार, श्री. प्रदिप दिलीप गायकवाड, मेस चेतन प्रभाकर पाटील, मे. गुरूकृपा स्टिल इंडस्ट्रिज, चे. श्री. जयभवानी मजुर सह. संस्था, श्री. विशाल वसंत जोग, श्री. मिलिंद शहा, श्रीराम कंस्ट्रक्शन, चे. सिध्देश्वर मजुर सह. संस्था, श्री. श्रीशैल एस. मेंडके, मे. प्रथमेश कंन्स्ट्रक्शन, सोनाई व्हीकेएमसीपीएल (जेव्ही), राजपथ प्रथमेश एसबीएमपीइ बीइसीएमपीएल (जेव्ही), पीबीए-आयव्हीकॉन-प्रथमेश संयुक्त अभियान, सह्याद्री कंन्स्ट्रक्शन, कावेरी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि., युवराज पाटील आणि कंपनी, इंगवले पाटील कंस्ट्रक्शन, कागवडे असोसिएट्स, मे. जय साई कंन्स्ट्रक्शन, सिध्दीविनायक कंस्ट्रक्शन, मे. एस. सी. शेख कॉन्ट्रक्टर आदी त्याच त्या मक्तेदारांना वारंवार कामे दिली आहेत. त्यांचीही चौकशी होऊन संबंधीत अधिकारी आणि मक्तेदार यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.
दक्षता पथक आणि टक्केवारीची सर्वत्र चर्चा…
टेंडर मॅनेजसाठी 5 टक्के ? स्टोअर बिलांसाठी 10 टक्के ? रेग्युलर वर्क ऑर्डरसाठी 2 टक्के ? घेतले जात असल्याची चर्चा खुद्द ठेकेदारच नाही तर संबंधीत कार्यालयातील अधिकारीही करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच यामध्ये विभागिय लेखापाल, टेंडर क्लार्क हे देखील सामिल असून त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच श्री. धुमाळ, श्री. कोंडेकर, विभागीय लेखापाल आणि टेंडर क्लार्क यांचे मत्ता दायित्व प्रमाणपत्र तपासावे आणि संबंधीत सर्व प्रकरणाची सखोल चौकशी “दक्षता पथका”कडून करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
‘इंदिरा आयव्हीएफ’च्या सर्व सेंटर्सवर तत्काळ बंदी आणून तनिषा भिसेंना न्याय द्या