सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
2026 या नव्या वर्षात 3 लाख रूपयांची लाच स्विकारून पहिला गुन्हा आणि नंतर लगेच फलटण प्रकरणात पुन्हा दुसरा गुन्हा स्वतःवर नोंदवून सार्वजनिक आरोग्य विभागातील पुणे उपसंचालक कार्यालयाची राज्यभरात प्रचार-प्रसिध्दी करण्यात आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार यांचा सिंहाचा वाटा. या दोन्ही प्रकरणांमुळे त्यांना कारागृहात रहावे लागले. परिणामी या दोन्ही प्रकरणांमुळे घ्यार यांना सध्या निलंबीत केले आहे. परंतु निलंबन काळात ही शांत बसतील ते घ्यार कसले. “आरोग्यसेवक रामकिसन घ्यारची वारी, MMIT च्या दारी…” हा उपक्रम त्यांच्याकडून नुकताच पार पडला.
हे ही वाचा बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ
घडलेली घटना अशी की, लोहगाव येथील एमएमआयटी मधील 13 विद्यार्थी दूषीत पाण्यामुळे आजारी पडले होते. या विद्यार्थ्यांकडून दुषीत पाण्यामुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या, थकवा, चक्कर येणे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना ॲडमीट करून यातील विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्जही दिला. मात्र या गंभीर घटनेची दखल पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि जि. प. आरोग्य विभाग, पुणे यांनी घेतली. त्यासंबंधी तपासणी व चौकशीकामी लोहगाव येथील एमएमआयटी मध्ये पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीना मधुकर बोराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी एमएमआयटी कॅम्पस आणि वसतीगृहाची पाहणी, कॅम्पसमधील अनेक पाण्यांच्या स्त्रोतांमधून पाण्याचे नमुने गोळा करून सर्व पाणी नमुणे प्रयोगशाळेत पाठवले. तसेच जि. प. आरोग्य विभागानेही यासंदर्भात पाहणी करून MMIT मध्ये बैठक घेतली. ज्या बैठकीला निलंबीत आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार हेही उपस्थित होते. येथे घ्यार यांनी उपस्थित MMIT चे अधिकारी आणि जि. प. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले ? सुचना दिल्या ? उपाययोजना सांगितल्या का ? निलंबीत असतानाही त्यांचे मुख्यालय कोठे आहे ? घ्यार यांनी कोठे हजेरी लावायला हवी ? त्यांचे कार्यक्षेत्र MMIT आहे ? त्यांना MMIT मध्ये जाऊन बैठकीस हजेरी लावण्याचा आदेश कोणी दिला ? निलंबीत कालावधीतही नको ते उपद्वयाप करण्यास कोणाची मुक संमती आहे ? असे अनेक प्रश्न खुद्द सार्वजनिक आरोग्य विभागात चर्चीले जात आहेत. मात्र याला जबाबदार कोण ? तसेच वरिष्ठांकडून घ्यार यांना याबाबत नोटीस देऊन खुलासा घेणार आहेत का ? यावर कारवाई करणार आहेत का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा डॉ. संतोष नवले, मशाक मुजावर चौकशीच्या फेऱ्यात
तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
उपसंचालकांच्या नावे 3 लाख रूपये लाच स्विकारताना आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार ला अटक





